मिठी मारण्यासाठी पैसे घेते ही महिला, एका तासात कमावते 7400 रूपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 15:16 IST2024-03-26T15:14:35+5:302024-03-26T15:16:28+5:30
भारतात आनंद असो वा दु:खं मिठी मारण्याचं फार चलन आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, परदेशात प्रेमाची मिठी मारण्यासाठी पैसे मोजावे लागतात.

मिठी मारण्यासाठी पैसे घेते ही महिला, एका तासात कमावते 7400 रूपये...
सोशल मीडियामुळे जगात किती प्रकारच्या नोकऱ्या आहेत हे समजतं. यातील अशा नोकऱ्या असतात ज्या भारतात नसतातही आणि त्यांबाबत माहितही नसतं. काही लोकांना आपल्या नोकरी खूप शारीरिक मेहनत करावी लागते तर काही लोकांची आरामात एसीमध्ये बसून नोकरी असते. अशीच एक नोकरी म्हणजे प्रोफेशनल कडलरची आहे. ज्यात लोक प्रेम आणि आराम मिळवण्यासाठी पैसे खर्च करतात.
भारतात आनंद असो वा दु:खं मिठी मारण्याचं फार चलन आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, परदेशात प्रेमाची मिठी मारण्यासाठी पैसे मोजावे लागतात. अनिको रोज नावाची महिला हेच काम करते. ती एक प्रोफेशनल कडलर आहे. जी लोकांना मिठी मारून त्यांना शांत करते आणि आराम देते.
एका तासाचे किती पैसे?
अनिको या अनोख्या कामाच्या माध्यमातून म्हणजे लोकांना मिठी मारून रग्गड कमाई करते आहे. अमेरिकेच्या मॅनचेस्टरमध्ये राहणारी ही महिला या कामाद्वारे चांगली कमाई करत आहे आणि तिच्याकडे ग्राहकांची लाइन लागलेली असते. या कामाच्या एका तासासाठी ही महिला 7 हजार 400 रूपये घेते. 42 वर्षीय अनिको 3 वर्षापासून कडलिंगचं काम करत आहे. कडलिंगच्या माध्यमातून आनंद देणाऱ्या हॉर्मोनची निर्मिती वाढते आणि व्यक्तीचा तणाव, एकटेपणा आणि निराशा कमी करण्यास मदत मिळतो.
अनिको म्हणते की, याप्रकारच्या कडलिंगमुळे ऑक्सीटोन हॉर्मोन रिलीज होतात. ज्याना लव्ह ड्रग म्हटलं जातं. हे ग्राहकांना प्रेम आणि सुरक्षेचं फीलिंग देतं. डोपामाइन आणि सेरोटोनिनसारख्या हॉर्मोनमुळे व्यक्तीला आनंदी वाटतं. अनिको एक प्रोफेनशल कडल थेरपिस्ट आहे आणि अशा लोकांची मदत करते जे लोक निराश किंवा चिंतेत आहेत. तिच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये 20 ते 65 वयातील लोकांचा समावेश आहे. तिची थेरपी एक तासाची असते. ज्या लोकांना वेळ वाढवायची आहे त्यांना ती डिस्काउंटही देते.