'माझ्या पतीचं माझ्या आईसोबत अफेअर सुरू होतं, मग मी...', महिलेने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:10 IST2024-01-08T09:10:03+5:302024-01-08T09:10:19+5:30

माझी आई आमच्यासोबतच राहत होती. ती बेसमेंटमध्ये राहत होती. काही महिन्यांनंतर तिने जवळच एक घर भाड्याने घेतलं.

Woman caught husband mother extramarital affair tells story on social media | 'माझ्या पतीचं माझ्या आईसोबत अफेअर सुरू होतं, मग मी...', महिलेने केला धक्कादायक खुलासा

'माझ्या पतीचं माझ्या आईसोबत अफेअर सुरू होतं, मग मी...', महिलेने केला धक्कादायक खुलासा

एका महिलेने दावा केला की, जेव्हा तिला समजलं की, तिच्या पतीचं तिच्या आईसोबत अफेअर सुरू आहे तेव्हा तिला धक्का बसला. तिने सोशल मीडियावर याबाबत सांगितलं. या महिलेच्या व्हिडिओला 2.7 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं. लॅसी जेन नावाच्या या महिलेने सांगितलं की, मला माझा पती आणि आईच्या अफेअरबाबत कसं समजलं हे सांगत आहे. माझी आई आमच्यासोबतच राहत होती. ती बेसमेंटमध्ये राहत होती. काही महिन्यांनंतर तिने जवळच एक घर भाड्याने घेतलं. माझा पती आणि ती सोबतच नोकरीवर जात होते.

न्यूज एयूच्या रिपोर्टनुसार, लॅसी अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये राहते. ती म्हणाली की, तिचा पती आणि आईचं अफेअर 14 वर्षाआधी सुरू झालं होतं. तेव्हा मी एका मुलीला जन्म दिला होता. पण तिला आरोग्यासंबंधी काही समस्या होत्या. नंतर तिला आपली आई आणि पतीवर संशय आला. लॅसी सांगते की, मुलीच्या जन्मानंतर माझी आई आमच्यासोबत राहण्यासाठी आली होती. यादरम्यान ती सांगत होती की, माझ्या पतीचं अनेक महिलांसोबत अफेअर सुरू आहे. पण म्हणाली की, याबाबत पतीला काही सांगू नको.

पण लॅसी थांबली नाही. ती पतीकडे गेली आणि तिने त्याला विचारलं की, तू मला दगा देत आहे का? हे मला माझ्या आईने सांगितलं. यावर लॅसीचा पती तिला म्हणाला की, तू तुझ्या आईला जाऊन का विचारत नाही की, तिच्यात आणि माझ्यात काय सुरू आहे.

लॅसी पतीच्या कारमधून उतरली आणि आपल्या आईला याबाबत विचारू लागली. तिची आई हे ऐकून घाबरली. अशात लॅसीने आपल्या आईला घरातून निघून जाण्यास सांगितलं. लॅसीची आई म्हणाली की, तिने जावयाचा हात नक्कीच पकडला होता, पण त्यांच्या अफेअर असं काही सुरू नाहीये. लॅसीला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. आता ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. ती मुलीचा एकटी सांभाळ करत आहे. लॅसीने सिंगल मातांसाठी घर बनवून देण्यासाठी एक संस्था सुरू केली आहे.

Web Title: Woman caught husband mother extramarital affair tells story on social media