Woman catches her boyfriend cheating after fitbit records unusual activity at 4 am | सकाळी चार वाजता बॉयफ्रेन्डची 'विचित्र' हालचाल, फिटबीट नोटीफिकेशनमुळे झाला भांडाफोड 
सकाळी चार वाजता बॉयफ्रेन्डची 'विचित्र' हालचाल, फिटबीट नोटीफिकेशनमुळे झाला भांडाफोड 

अलिकडे लोक फिटनेसचे अपडेट ठेवण्यासाठी फिटबीट्सचा वापर करू लागले आहेत. हे फिटबीट्स अनेकांच्या लाइफस्टाईलचा भाग झाले आहेत. पण अनेकदा असं होतं की, टेक्नॉलॉजीच्या वापरण्याच्या नादात आपलीच अनेकदा पंचाईत होते. आता हेच बघा ना....फिटबीट्समुळे एका दगाबाज बॉयफ्रेन्डचा भांडाफोड झालाय. आता तुम्हालाही धडकी भरली असेल आणि असं कसं झालं? असा प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊ हे कसं झालं. 

आधी हे जाणून घेऊ की, फिटबीट्समुळे आपल्या स्टेप्स, हार्ट बीट, झोपेची क्वालिटी, शारीरिक हालचाल याचे अपडेट मिळतात. पण इथेच एकाची पंचाईत झाली. एनएफएल नेटवर्कची रिपोर्टर जेन स्लेटरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेबाबत एक पोस्ट लिहिली आणि सांगितले की, कशाप्रकारे तिने बॉयफ्रेन्डला एका मुलीसोबत रंगेहात पकडलं होतं. 

स्लेटरने लिहिले की, 'माझ्या एक्स बॉयफ्रेन्डने एकदा मला ख्रिसमस गिफ्ट म्हणून फिटबीट आणून दिलं होतं. मला ते फारच आवडलं. आमच्या दोघांचा एकमेकांवर फार विश्वास होता. पण एक दिवस सकाळी ४ वाजता मी एक वेगळ्या प्रकारची हालचाल पाहिली. माझ्या बॉयफ्रेन्डच्या फिजिकल अ‍ॅक्टिविटीची लेव्हल फार वाढली होती. त्याचं नोटीफिकेशन मला आलं. कारण आम्ही एकमेकांचे फिटबीट्स सींक करून घेतले होते'. 

ट्विटच्या शेवटी तिने लिहिले की, आशा करते की ते खरं असू नये. नंतर तिने लिहिले की, तो ४ वाजता ऑरेंज थेअरी क्लासमध्ये उपस्थित नव्हता. ऑरेंज थेअरी क्लास हा फिटनेस क्लास असतो. ज्यात १२ मिनिटांची हेवी एक्सरसाइज करायची असते.

स्लेटरच्या या पोस्टवर अनेकांनी रिप्लाय दिलाय. यातील एकजण म्हणाला की, 'अशाप्रकारच्या जेवढ्या गोष्टी मी ऐकतो, तेव्हा मला हे जाणवतं की, मी सिंगल आहे हेच चांगलं आहे'. अनेकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत.


Web Title: Woman catches her boyfriend cheating after fitbit records unusual activity at 4 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.