शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

दोन हात गमवावलेली ही महिला आपल्या बाळाचा असा करते सांभाळ, पाहुन डोळ्यात पाणी येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:48 IST

सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे.

काहीजणं स्वत: च्या शारिरक अपंगत्वावर अशी मात करतात की ते इतरांसाठी प्रेरणा बनून जातात. बेल्जियममधील एक महिलाही प्रत्येकासाठी अशीच एक प्रेरणा आहे. सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. अपंग असूनही सारा जीवनाच्या सर्व अडचणींना खंबीरपणे तोंड देते. चला तर मन आता साराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

द मिरर या वेबसाईटमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ३८ वर्षीय सारा हातांनी करता येणारी प्रत्येक गोष्ट तिच्या पायांनी करते. सारा ब्रुसेल्सची आहे. ती म्हणते की ती तिच्या पायांनी सर्व काही करू शकते. साराच्या म्हणते, तिला जन्मापासून हात नसल्याची अजिबात खंत नाही. ती म्हणाली, सुरुवातीला पायांनी काम करताना अडचणी येत होत्या, पण नंतर मला त्याची सवय झाली. सारानं शालेय शिक्षणानंतर इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांतराचा अभ्यासही केला आहे.

सारा म्हणते, मी घरातील सर्व कामे पायाने करते. यामध्ये केर काढण्यापासून ते भाजी कापण्यापर्यंत, अगदी कम्प्युटरवर काम करण्यापर्यंत सारी कामे मी पायाने करते. साराला लिलिया नावाची दोन वर्षांची मुलगी आहे, तिचा जन्म २०१८ मध्ये झाला. सारा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. या अकाऊंटवर ती तिच्या आणि मुलीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

साराचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर चटकन लक्षात येतं की ती आपल्या मुलीची खूप काळजी घेते. मुलीसाठी पायाने अन्न बनवण्यापासून ते मुलीला चमच्याने खाऊ घालण्यापर्यंत सारा सगळी कामं करते. सारा म्हणते की, ती एका मुलीची आई आहे. याबद्दल ती खूप आनंदी आहे. इन्स्टाग्रामवर सारानं तिच्या मुलीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघीही मजा करताना दिसत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामBrazilब्राझीलWomenमहिला