काय सांगता! एका दिवसात स्वत:ची ५ ग्लास यूरिन पिते ही महिला, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 04:30 PM2021-11-17T16:30:31+5:302021-11-17T16:31:27+5:30

इतकंच नाही तर ती महिला म्हणाली की, तिला लघवी पिण्याची सवय झाली आहे. याचं कारणही तिने मजेदार सांगितलं.

Woman addicted to drink urine says I love drinking my own urine taste like champagne | काय सांगता! एका दिवसात स्वत:ची ५ ग्लास यूरिन पिते ही महिला, कारण वाचून व्हाल अवाक्....

काय सांगता! एका दिवसात स्वत:ची ५ ग्लास यूरिन पिते ही महिला, कारण वाचून व्हाल अवाक्....

Next

अमेरिकेत (America) राहणाऱ्या महिलेबाबत एक फारच विचित्र घटना समोर आली आहे. लोक या घटनेबाबत वाचून चक्रावून गेले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या ५३ वर्षीय महिला कॅरी म्हणाली की, तिला तिची लघवी प्यायला आवडते. ती गेल्या चार वर्षापासून तिची लघवी पिते. इतकंच नाही तर ती महिला म्हणाली की, तिला लघवी पिण्याची सवय झाली आहे. याचं कारणही तिने मजेदार सांगितलं.

'द सन यूके'च्या एका रिपोर्टनुसार, कोलोराडो येथे राहणारी कॅरी चार वर्षापासून तिच्या लघवीचं सेवन करत आहे. कॅरीने स्वत: मान्य केलं की, तिला पाण्याच्या तुलनेत यूरिन पिणं सोपं वाटतं. ती दिवसातून कमीत कमी ५ ग्लास तिचं यूरिन पिते. म्हणजे चार वर्षात ती तिची साधारण ३४०६ लीटर लघवी प्यायली असेल.

TLC मध्ये माय  स्ट्रेंज एडिक्शनवर बोलताना कॅरी म्हणाली की, 'मला गरम यूरिन आवडते. त्याने मला आराम मिळतो. मी जे खाते त्या आधारावर माझ्या यूरिनचं गंध येतो. आजची टेस्ट चार वर्षाआधीच्या तुलनेत वेगळी आहे.'. कॅरीनुसार, कधी कधी लघवी खारट असते तर कधी कधी टेस्ट शॅम्पेनसारखी असते.

कॅरीला चार वर्षाआधी तिला मेलेनोमा कॅन्सर असल्याचं समजलं होतं तेव्हा तिने यूरिन पिण्यात सुरूवात केली होती. तिने कीमोथेरपीऐवजी यूरिनच्या माध्यमातून आपल्या उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. कॅरी सांगते की, 'मी टूथपेस्टसाठीही यूरिनचा वापर करते'.

कॅरीची मुलगी तिला हे सगळं करण्यापासून रोखते. ती तिच्या आईला डॉक्टरकडेही घेऊन गेली होती. पण कॅरी काही लघवी पिणं सोडत नाहीये. ती म्हणते की, मी जर लघवी पिणं बंद केलं तर मी मरेन.
 

Web Title: Woman addicted to drink urine says I love drinking my own urine taste like champagne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.