112 वर्ष वय, 7 वेळा लग्न तरीही आजीला हवाय जीवनसाथी, म्हणते, कोणी प्रपोज केलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 14:28 IST2024-01-14T14:17:01+5:302024-01-14T14:28:31+5:30

आजीने आतापर्यंत सात वेळा लग्न केलं आहे. पण पुन्हा लग्नाचा प्रस्ताव आला तर ती नाकारणार नाही.

woman 112 year old married seven times says open to remarry if someone propose | 112 वर्ष वय, 7 वेळा लग्न तरीही आजीला हवाय जीवनसाथी, म्हणते, कोणी प्रपोज केलं तर...

फोटो - आजतक

महिलेचं वय 112 वर्षे आहे. पण जगण्याची इच्छा आजही पूर्वीसारखीच आहे. सीती हावा हुसैन असं आजीचं नाव आहे. आजीने आतापर्यंत सात वेळा लग्न केलं आहे. पण कोणी प्रपोड केलं तर किंवा पुन्हा लग्नाचा प्रस्ताव आला तर ती नाकारणार नाही. गंमत म्हणून आजीने हे सांगितलं आहे. मलेशियातील केलंतन येथील रहिवासी असलेल्या आजीने सांगितलं की, माझ्या काही एक्स पतींचा मृत्यू झाला आहे. 

इतकं जास्त वय असूनही सीती आजी सगळी कामं चपळाईने करतात. ती दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते. जेव्हा तिला तिच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितलं की ती तिच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेते. तिचा 58 वर्षांचा धाकटा मुलगा अली सीमीने सांगितलं की त्याची आई जेवण कधीच सोडत नाही आणि दररोज औषध घेते. 

आजही ती खाली बसून पाच वेळा नमाज अदा करते. तिची स्मरणशक्ती थोडी कमजोर असली तरीही ती आपल्या मुलांना आणि नातवंडांना गोष्टी सांगते. सून म्हणते की,ती पूर्णपणे बरी आहे, केवळ तिच्या म्हातारपणामुळे ती कधीकधी गोष्टी विसरते. ती स्वतः जेवते. तिला पाच मुलं आहेत. सर्व 58 ते 65 वयोगटातील असून 19 नातवंडे आणि 30 पतवंड आहेत. 
 

Web Title: woman 112 year old married seven times says open to remarry if someone propose