एकाच दिवशी महिलेने दोन पुरूषांसोबत ठेवले संबंध, दोघांच्या जुळ्या बाळांना दिला जन्म आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:15 IST2022-09-08T13:14:39+5:302022-09-08T13:15:20+5:30

टेस्टचा रिपोर्ट धक्कादायक होता. ज्या व्यक्तीला दोन्ही बाळांचा वडील मानलं जात होतं. मुळात त्याचं एकच बाळ होतं. दुसऱ्या बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. 

Woma gives birth to twins from two fathers after having intercourse with them on same day | एकाच दिवशी महिलेने दोन पुरूषांसोबत ठेवले संबंध, दोघांच्या जुळ्या बाळांना दिला जन्म आणि मग...

एकाच दिवशी महिलेने दोन पुरूषांसोबत ठेवले संबंध, दोघांच्या जुळ्या बाळांना दिला जन्म आणि मग...

19 वर्षीय एका तरूणीने जुळ्या मुलांना जन्म दिला. खास बाब म्हणजे दोन्ही बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. झालं असं की, तरूणीने दोन्ही पुरूषांसोबत एकाच दिवशी संबंध ठेवले होते. मात्र, अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पुरूषांपासून एकत्र प्रेग्नेंट होण्याच्या घटना फार दुर्मीळ असतात.

ही घटना पोर्तुगालच्या गोयस राज्यातील आहे. येथील मिनेरोस शहरातील एका तरूणीने जुळ्या बाळांना जन्म दिला. आईने आपली ओळख सार्वजनिक न करण्याच्या अटीवर सांगितलं की दोन्ही बाळ जेव्हा आठ महिन्यांचे झाले तेव्हा त्यांची DNA टेस्ट केली होती. 

टेस्टचा रिपोर्ट धक्कादायक होता. ज्या व्यक्तीला दोन्ही बाळांचा वडील मानलं जात होतं. मुळात त्याचं एकच बाळ होतं. दुसऱ्या बाळाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. 

तरूणीने सांगितलं की, मला आठवलं की मी त्याच दिवशी दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या व्यक्तीचा DNA दुसऱ्या बाळासोबत मॅच झाला. हा रिपोर्ट पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला नव्हतं माहीत की, असंही होऊ शकतं आणि कारण दोन्हीही बाळ एकसारखे दिसतात.
दरम्यान, बर्थ सर्टिफिकेटमध्ये दोन्ही बाळांचा वडील एकच देण्यात आला आहे. ती म्हणाली की, दोघेही बाळांचा सांभाळ करतात. दोन्ही बाळांच्या संगोपनात ते मदत करतात.

असामान्य गर्भावस्थेवर रिसर्च करत असलेले डॉ. टुलियो जॉर्ज फ्रॅंको म्हणाले की, जगभरात केवळ 20 अशा केसेसची माहिती मिळाली आहे. ज्यात जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे आहेत. मेडिकल भाषेत या कंडिशनला Heteroparental superfeundation म्हटलं जातं.

डॉक्टरांना सांगितलं की, अशी प्रेग्नेन्सी तेव्हाच होते जेव्हा एकच महिलेचे दोन Eggs वेगवेगळ्या पुरूषांनी फर्टिलाइज होतात. ते पुढे म्हणाले की, तरूणीची प्रेग्नेन्सी पूर्णपणे नॉर्मल होती. दोन्ही बाळ स्वस्थ आहेत आणि त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नाहीये. डॉक्टर म्हणाले की,  असं होणं फार दुर्मीळ आहे. मी कधीही विचार नव्हता केला की, मी कशी केस हाताळेन. 

Web Title: Woma gives birth to twins from two fathers after having intercourse with them on same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.