पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 10:16 IST2023-03-21T09:49:49+5:302023-03-21T10:16:29+5:30

चावीवान नेहमीच त्याच्यासोबत वाद घालत होती. तिने एका फोन कॉलच्या माध्यमातून नातं तोडलं आणि म्हणाली की, तिने हे नातं काही वर्षाआधीच तोडलं होतं.

Wife won the lottery of 3 crores immediately left her husband got second marriage | पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

पत्नीला लागली 3 कोटी रूपयांची लॉटरी, लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

Lottery Prize: संसार म्हटला की, पती-पत्नीमध्ये वाद-भांडणं सुरूच असतात. पण जेव्हाही एकमेकांना गरज पडते तेव्हा ते सगळं काही विसरून सोबत उभे राहतात. पण कधी कधी काही बायका आपल्या पतीला वैतागून त्यांना सोडण्याच्या तयारीत असतात. कधी कधी दोघांपैकी एक इतके स्वार्थी असतात की, ते कशाचाही विचार करत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीला 3 कोटी रूपयांची लॉटरी लागली आणि ती लगेच पतीला सोडून बॉयफ्रेंडसोबत राहू लागली.

एका व्यक्तीने सांगितलं की, जेव्हा त्याच्या पत्नीला लॉटरी लागली तेव्हा तिने लगेच मला सोडण्याचा आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिने याबाबत फोन करून सांगितलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. 47 वर्षीय नारिन आता पत्नी चावीवानला लागलेल्या लॉटरीतील अर्धा हिस्सा मागण्यासाठी कोर्टात जात आहे.

नारिनने चावीवानसोबत 20 वर्षाआधी लग्न केलं होतं. पत्नीला लॉटरीचे जवळपास 300,000 पाउंड म्हणजे 3 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली. पण त्यानंतर पत्नीने जे केलं त्याने पती निराश झाला. नारिनने मीडियाला सांगितलं की, मला धक्का बसला होता आणि मला कळत नव्हतं की, मी काय करावं. मी निराश होतो. मला अजिबात वाटलं नव्हतं की, माझी पत्नी माझ्यासोबत असं काही करेल.

चावीवान नेहमीच त्याच्यासोबत वाद घालत होती. तिने एका फोन कॉलच्या माध्यमातून नातं तोडलं आणि म्हणाली की, तिने हे नातं काही वर्षाआधीच तोडलं होतं.

नारिन म्हणाला की, तो कर्ज फेडण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये काम करत होता. पत्नीने 25 फेब्रुवारीला काही कारण नसताना माझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिने हेही लपवण्याचा प्रयत्न केला की, तिला लॉटरी लागली. याबाबत मला मुलीने सांगितलं.

तो 3 मार्चला घरी आला आणि त्याने पत्नीला भेटण्याचा प्लान केला. पण त्याला दिसलं की, पत्नी आता खूप पुढे निघून गेली आहे. इतकंच नाही तर तिला 3 कोटी रूपयांची लॉटरी लागल्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं.

Web Title: Wife won the lottery of 3 crores immediately left her husband got second marriage