अरे देवा! पतीला दुसऱ्या महिलेकडे पाठवत होती पत्नी, त्याने घाबरून पोलिसांना बोलवलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:14 IST2024-12-26T16:13:37+5:302024-12-26T16:14:20+5:30
आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत. ज्यात एका महिलेने लग्नाला एक खेळ बनवून ठेवलंय.

अरे देवा! पतीला दुसऱ्या महिलेकडे पाठवत होती पत्नी, त्याने घाबरून पोलिसांना बोलवलं आणि मग...
लग्नाला आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र आणि सात जन्माचं नातं मानलं जातं. पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. अशात दोघांपैकी कुणी एकानेही दगा दिला तर नातं तुटण्याची शक्यता जास्त असते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत. ज्यात एका महिलेने लग्नाला एक खेळ बनवून ठेवलंय. चीनच्या हुनान प्रांतातून ही घटना समोर आली आहे. इथे एका नवविवाहित महिलेने पतीसोबत असं काही केलं ज्याबाबत वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.
कोणतीही पत्नी आपल्या पतीला स्वत:हून दुसऱ्या महिलेकडे पाठवणार नाही. पण चीनमधील ही महिला पतीला दगा देण्यासाठी जबरदस्ती करत होती. आता हे प्रकरण कोर्टात गेलं असून सगळेच अवाक् झाले आहेत. तरूणीने कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे.
दगा देण्यासाठी भाग पाडत होती
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, एक पत्नी तिच्या पतीला विनंती करत होती की, त्याने एका दुसऱ्या महिलेकडे जावं. दोघांच्याही लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि पत्नी त्याच्यासोबत न राहण्यास कारण शोधत होती. अशात पतीला तिच्यावर संशय आला. स्वत:ला नवरीचे भाऊ असल्याचं सांगणारे दोन तरूण तिला पतीजवळ सोडून गेल्यावर पतीने पोलिसांना बोलवलं. तेव्हा जे समोर आलं हे ऐकून पोलिसही हैराण झाले.
काय होता तरूणीचा उद्देश?
मुळात तरूणी आणि तिच्या बॉयफ्रेन्डवर कर्ज होतं. अशात त्यांची भेट दोन तरूणांसोबत झाली. त्यांनी मॅरेज फ्रॉडबाबत या दोघांना सांगितलं. त्यांनी मॅचमेकिंग अॅपच्या माध्यमातून एका तरूणाला फसवलं आणि त्याच्यासोबत या तरूणीचं लग्न लावून दिलं. नवरदेवानं ब्राइड मनी म्हणून तरूणीला १६ रूपये हुंडा दिला. तर ६ लाख रूपयांचे दागिनेही दिले. हे ब्राइड मनी परत करावे लागू नये म्हणून प्लाननुसार तरूणी आपल्या नवविवाहित पतीला दगा देण्यासाठी भाग पाडत होती. चीनमध्ये जर पती दुसऱ्या महिलेकडे जात असेल तर नवरीला ब्राइड मनी परत करावे लागत नाही. तिला हेच पाहिजे होतं. पण पती हुशार निघाला आणि तिच्या प्लानवर पाणी फेरलं.