महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:05 IST2022-01-18T17:04:46+5:302022-01-18T17:05:05+5:30

America : पत्नीच्या या कारनाम्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमाही झाल्या आहेत.  तरीही घटनेच्या तीन आठवड्यांपर्यंत तो डॉक्टरकडे गेला नव्हता.

Wife put expanding foam inside impotent organ of husband man penis may never work again | महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी'

महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी'

एका महिलेने तिच्या पतीसोबत असं  काही केलं की, ज्याचा आयुष्यभर तिला पश्चाताप होणार आहे. तर पती तिच्या नावाने बोंबा मारत बसणार आहे. एका महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर Insulation Spray चा वापर केला. एक्सपर्ट म्हणाले की, पीडित व्यक्ती आता आयुष्यात कधीही संबंध ठेवू शकणार नाही.

४५ वर्षीय व्यक्तीला प्रायव्हेट पार्टची काहीतरी समस्या होती आणि पत्नीने ती समस्या ठीक करण्याच्या उद्देशाने भींतीचे गॅप भरण्यासाठी वापरण्यात येणारा Insulation Spray वापरला. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील आहे.

पत्नीच्या या कारनाम्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमाही झाल्या आहेत.  तरीही घटनेच्या तीन आठवड्यांपर्यंत तो डॉक्टरकडे गेला नव्हता. जखमा आपोआप बऱ्या होतील याची वाट बघत राहिला. पण त्याची स्थिती आणखी बिघडली.
तीन आठवडे ट्रीटमेंट सुरू न झाल्याने त्याच्या जखमा वाढल्या होत्या. त्याला लघवी करण्यात अडचण येत होती. लघवीच्या जागेवरून रक्त निघत होतं. नंतर सर्जरीच्या माध्यमातून व्यक्तीने प्रायव्हेट पार्टवरून Insulation मटेरिअल काढलं.

व्यक्तीच्या उपचारादरम्यान डॉक्टरांना Perineal Urethrostomy नावाची एक अवघड सर्जरीही करावी लागली होती. आता सर्जरीनंतर व्यक्ती रिकव्हर होत आहे. पण त्याला आणखी Urethra ची सर्जरी करण्याची गरज पडेल.

डॉक्टर नेहमीच सांगत असतात की, प्रायव्हेट पार्टमध्ये एखादी समस्या असेल तर हॉस्पिटलमध्ये उशीरा जाणं लोकांना महागात पडू शकतं. काही लोक लाजेमुळे सुरूवाताली डॉक्टरकडे जात नाहीत. पण समस्या वाढू नये असे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरकडे गेलं पाहिजे.

हे पण वाचा :

भारत विरूद्ध पाकिस्तान : कधीह न विसरता येणाऱ्या ५ बेस्ट मॅचेस!
 

Web Title: Wife put expanding foam inside impotent organ of husband man penis may never work again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.