गुन्हेगाराला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, मग पतीच्या हत्येचा घेतला सूड; सिनेमासारखीच आहे खरी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:49 IST2023-03-21T15:49:19+5:302023-03-21T15:49:35+5:30
Woman Trapped Murderer of Husband for Revenge : ही खरी कहाणी आहे कोलंबियात राहणाऱ्या एका महिलेची. तिने पतीला गमावलं होतं. हा काही अॅक्टिडेंट किंवा आजार नव्हता. तर स्थानिक गुडांनी तिच्या पतीला संपवलं होतं.

गुन्हेगाराला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, मग पतीच्या हत्येचा घेतला सूड; सिनेमासारखीच आहे खरी कहाणी
Woman Trapped Murderer of Husband for Revenge : आपण सिनेमांमध्ये एखादी स्टोरी बघतो तेव्हा या स्टोरी कुठे ना कुठे आपल्या जीवनाशी संबंधित वाटतात. तर काही लोक या स्टोरी पाहून इन्स्पायर होतात. तेच क्राइम ड्रामाबाबत सांगायचं तर पडद्यावर दाखवतात तसं खऱ्या आयुष्यात कमीच होतं. आज आम्ही तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहोत, जी वाटते फिल्मी पण आहे 100 टक्के खरी.
ही खरी कहाणी आहे कोलंबियात राहणाऱ्या एका महिलेची. तिने पतीला गमावलं होतं. हा काही अॅक्टिडेंट किंवा आजार नव्हता. तर स्थानिक गुडांनी तिच्या पतीला संपवलं होतं. विधवा पत्नीने केवळ रडत बसण्यापेक्षा पतीच्या हत्येचा सूड घेण्याचा विचार केला. त्यासाठी तिने एक प्लान केला आणि त्यासाठी अनेक वर्ष दिलीत. तिचा प्लानबाबत वाचाल तर तुम्हीही तिला दाद द्याल.
आरोपीसोबत केलं प्रेमाचं नाटक
महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी जे केलं ते पोलीस किंवा सेना करू शकत नव्हती. महिलेने एका अशा गुन्हेगाराला फसवण्याचा प्रयत्न केला जो समाजात सन्मानित व्यापारी होता आणि धार्मिक कार्यातही सहभागी राहत होता. पण मुळात तो एक गुंड होता. जो स्मगलिंगसोबत हत्याही करत होता.
तो सामान्य राहत असल्याने त्याला कुणी पकडू शकत नव्हतं. महिलेच्या पतीची हत्याही त्यानेच केली होती. अशात तिने हळूहळू जुआंचो नावाच्या या गुन्हेगाराच्या सोशल सर्कलमध्ये घुसण्यास सुरूवात केली. ती त्याच्या जवळ पोहोचली.
कसं समोर आलं सत्य
गुन्हेगार तिच्या प्रेमात आंधळा झाला आणि तिला आपल्या सगळ्या धंद्याची माहिती देऊ लागला. जेव्हा महिलेकडे पुरेसे पुरावे जमा झाले, तेव्हा तिने ती सगळे पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांना एका अशा मीटिंगबाबत सांगितलं जिथे तो जाणार होता. दोन वर्षापासून पोलिसांना या व्यक्तीवर संशय होता. पण महिलेच्या मदतीने त्यांनी त्याला रंगेहाथ पकडलं. आता कोलंबियात ही महिला मीडिया आणि पोलिसांमध्ये हिरो बनली आहे. तिने केवळ पतीच्या हत्येचा सूडच घेतला नाही तर गुन्हेगाराला पकडूनही दिलं.