व्हिडीओ गेममुळे जगातील सर्वात सुंदर मुलीचे झाले ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 16:46 IST2018-07-25T16:46:27+5:302018-07-25T16:46:53+5:30
तरूणाईमध्ये ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली, वाचली असतील. काही दिवसांपूर्वी मोबाईलच्या अतिवापरामुळेही जोडप्यांमध्ये ब्रेकअप होत असल्याचे समोर आले होते.

व्हिडीओ गेममुळे जगातील सर्वात सुंदर मुलीचे झाले ब्रेकअप
तरूणाईमध्ये ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही ऐकली, वाचली असतील. काही दिवसांपूर्वी मोबाईलच्या अतिवापरामुळेही जोडप्यांमध्ये ब्रेकअप होत असल्याचे समोर आले होते. अशीच एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. जगातल्या सर्वात सुंदर तरूणीचंही ब्रेकअप झालं असून या ब्रेकअपचं कारणही असंच विचित्र आहे.
जगातल्या या सर्वात सुंदर तरूणीचं नाव Yanet Garcia असं असून ती मेक्सिकोमध्ये राहणारी आहे. हिला जगातील Sexiest Weather Girl हा किताब देऊन गौरवण्यात आलंय. सध्या तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना फारच उधाण आलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं ब्रेकअप होण्याचं कारण म्हणजे व्हिडीओ गेम ठरल्याचं सांगितलं जात आहे. इतक्या सुंदर मुलीला फक्त व्हिडीओ गेमसाठी कोम का म्हणून सोडून जाईल असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल? जाणून घेऊयात नक्की काय कारण आहे, यानेटच्या ब्रेकअपचं.
झालं असं की, Douglas Martin आणि Yanet मागील तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. मार्टीन व्यवसायाने 'कॉल ऑफ ड्यूटी' प्रो व्हिडीओ गेम प्लेयर आहे. त्याने जास्तीत जास्त वेळ व्हिडीओ गेमसोबत घालवता यावा यासाठी Yanet सोबत ब्रेकअप केलं आहे. याची माहीत स्वतः मार्टीनने एका व्हिडीओद्वारे दिली आहे.
मार्टीनने सांगितले की, त्याच्याकडे सध्या रिलेशनशिपसाठी जास्त वेळ नाही. तसेच त्याने सांगितले की, आता त्याला 'कॉल ऑफ ड्यूटी' व्हिडीओ गेम्सच्या अनेक स्टेजेस पार करायच्या आहेत. त्यामुळे तो हे नातं पुढे नाही घेऊन जाऊ शकत.
मार्टीनने पुढे सांगितले की, 'आता यानेटला सुपर मॉडेल बनण्याची इच्छा आहे. सध्या ती आपल्या करिअरवर लक्ष देत आहे. तसेच मलाही 'कॉल ऑफ ड्यूटी'च्या नेक्स्ट लेवलवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.'