टॉयलेट फ्लशमध्ये दोन बटनं का असतात? कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:05 IST2019-05-28T14:58:49+5:302019-05-28T15:05:50+5:30
वेस्टर्न टॉयलेट अलिकडे आता बहुतेक ठिकाणी बघायला मिळत आहेत. भलेही ग्रामीण भागात इंडियन टॉयलेट असतील पण शहरात तर वेस्टर्न टॉयलेटच असतात.

टॉयलेट फ्लशमध्ये दोन बटनं का असतात? कारण वाचून व्हाल अवाक्
वेस्टर्न टॉयलेट अलिकडे आता बहुतेक ठिकाणी बघायला मिळत आहेत. भलेही ग्रामीण भागात इंडियन टॉयलेट असतील पण शहरात तर वेस्टर्न टॉयलेटच असतात. याप्रकारच्या टॉयलेटमध्ये दोन प्रकारचे फ्लश बटन असतात. ज्यातील एक छोटं असतं, तर दुसरं मोठं असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का? की, या दोन बटनांचा वापर कशासाठी केला जातो.
(Image Credit : UX Collective)
अमेरिकेतील डिझायनर व्हिक्टर पापानेकने टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असलेलं फ्लश देण्याची आयडिया दिली होती. सुरूवातीला यावर छोट्या प्रमाणात टेस्ट केली गेली होती. ही टेस्ट यशस्वी झाल्यावर याचा वापर जगभरात होऊ लागला.
जगभरात सध्या पाण्याची समस्या समस्या भीषण झाली आहे. पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जात आहेत. वेस्टर्न टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असणाऱ्या फ्लशचा वापर पाणी वाचवण्यासाठी केला जातो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये मोठं बटन सॉलिड वेस्ट रिमुव्हलसाठी असतं, जे दाबल्यावर ६ लिटर ते ९ लिटर पाणी वाहतं. तर छोटं बटन दाबल्यावर वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे तीन ते चार लिटर असतं.