Indian Railway: रेल्वे रुळांच्या मधोमध का टाकलेली असते खडी? यामागे दडलीय एक रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:01 PM2022-02-21T15:01:11+5:302022-02-21T15:26:24+5:30

रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच.

why there are stones laid between railway track know the interesting reason | Indian Railway: रेल्वे रुळांच्या मधोमध का टाकलेली असते खडी? यामागे दडलीय एक रंजक गोष्ट

Indian Railway: रेल्वे रुळांच्या मधोमध का टाकलेली असते खडी? यामागे दडलीय एक रंजक गोष्ट

googlenewsNext

देशातील कोट्यवधी लोक दररोज रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. लोकल (Mumbai Local) ही तर मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. तुम्ही देखील अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच. खरंतर जेव्हापासून रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच ट्रॅकदरम्यान खडीचा वापर केला जात आहे. यामागे विशेष असं कारण आहे. रेल्वेची एकूण रचना गृहित धरून रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली असते. ट्रॅकची निर्मिती करताना प्रत्येक बाबीचा काटेकोर विचार केलेला असतो.

रेल्वेचा ट्रॅक दिसायला साधा असला तरी प्रत्यक्षात त्याची रचना तशी नसते. ट्रॅकच्या खाली कॉंक्रिटचे स्तर (Concrete layers) असतात, त्याला स्लिपर (Sleeper) असं म्हणतात. या स्लिपरच्या खाली खडी असतात, त्याला बलास्ट (Ballast) म्हणतात. या बलास्टच्या खाली मातीचे दोन थर असतात आणि सर्वांत खाली जमीन असते. जेव्हा या ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपनं निर्माण होतात. त्यामुळे रूळ विलग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनं कमी करण्यासाठी तसेच रूळ वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुळांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्यम आकाराचे दगड टाकले जातात.

जेव्हा रेल्वे रुळावरून धावते तेव्हा तिचा सर्व भार कॉंक्रिटच्या स्लिपरवर पडतो. आजूबाजूला असलेल्या खडींमुळे क्रॉंक्रिट स्थिर राहण्यास मदत होते. या खडींमुळे स्लीपर घसरत नाही. रेल्वेच्या रुळांदरम्यान पाणी साचू नये, यासाठी देखील रुळांदरम्यान खडी टाकलेली असते. पावसाचे पाणी रुळावर पडल्यानंतर ते खडींमधून जमिनीत जाते. त्यामुळे रुळांदरम्यान पावसाचे पाणी साचून राहत नाही. याशिवाय रुळांदरम्यान टाकलेली खडी पाण्यात वाहूनही जात नाही.

लोखंडापासून बनवलेल्या एका रेल्वेचे वजन सुमारे 10 लाख किलोंपर्यंत असते. केवळ ट्रॅक हे वजन पेलू शकत नाहीत. एवढ्या अवजड रेल्वेचं वजन पेलण्यात लोखंडाचे रुळ, कॉंक्रिटची स्लिपर आणि खडी अशा सर्वांचा हातभार लागतो. तसं पाहायला गेलं तर रेल्वेचं बहुतांश वजन या खडींवरच असतं. या खडींमुळे स्लिपर जागचे हलू शकत नाहीत. जर रेल्वे ट्रॅकवर अशी खडी टाकली नाहीत तर संपूर्ण ट्रॅकवर गवत आणि झाडं-झुडपं उगवतील. असं झाल्यास रेल्वे धावण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी रेल्वे रुळांदरम्यान खडी टाकली जातात.

Web Title: why there are stones laid between railway track know the interesting reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.