धोक्याचा इशारा देण्यास लाल रंगच का दाखवला जातो? पाहा काय आहे याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:15 IST2025-08-30T16:10:57+5:302025-08-30T16:15:06+5:30

Interesting Facts : धोक्याची घंटा किंवा गोष्टी थांबवण्यासाठी लाल रंगाचाच वापर का केला जातो? लाल रंगच का सावधानतेचा इशारा असल्याचा संकेत असतो?

Why red color is used as sign of danger? Know reason | धोक्याचा इशारा देण्यास लाल रंगच का दाखवला जातो? पाहा काय आहे याचं कारण...

धोक्याचा इशारा देण्यास लाल रंगच का दाखवला जातो? पाहा काय आहे याचं कारण...

Interesting Facts : आपण पाहिलं असेलच की, सिग्नलवर थांबायचं असेल तर लाल लाइट लागतो, गाडीचा ब्रेक लावल्यावरही लाल लाइट लागतो. अ‍ॅम्बुलन्सचा लाइटही लाल असतो. इतकंच काय तर रेल्वे थांबवण्यासाठीही लाल झेंडा किंवा लाइट दाखवला जातो. पण आपल्याला कधी प्रश्न पडलाय का की, धोक्याची घंटा किंवा गोष्टी थांबवण्यासाठी लाल रंगाचाच वापर का केला जातो? लाल रंगच का सावधानतेचा इशारा असल्याचा संकेत असतो?

पण आपण कधी विचार केलाय का की, धोका असल्याचं सांगण्यासाठी लाल रंगच का निवडला गेला? त्याऐवजी हिरवा, पिवळा किंवा निळा रंग का निवडला गेला नाही? यामागे काही सायन्स आहे का? या प्रश्नाची उत्तरं आपण पाहणार आहोत.

दुरून दिसतो

लाल रंगाची वेव्ह लेंथ सगळ्यात लांब असते, ज्यामुळे हा रंग इतर रंगांच्या तुलनेनं दुरून सहजपणे दिसतो. हेच कारण आहे की, नैसर्गिक घटना जशा की, सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी आकाशात लाल रंग दिसतो. याच गुणामुळे लाल रंग इशारा देण्यासाठी चांगला मानला जातो. जेणेकरून लोक दुरूनच सावध होतील आणि धोका टाळता येईल.

सायकॉलॉजिकल इफेक्ट

सायकॉलॉजीनुसार, लाल रंग मेंदूला लगेच अ‍ॅक्टिव करतो. हा रंग अग्रेशन, जोश आणि धोक्याची भावना निर्माण करतो, ज्यामुळे लोक सतर्क होतात. इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग बघून मनुष्यांचा मेंदू लगेच प्रतिक्रिया देतो, त्यामुळे याला धोक्याचा इशारा देण्यासाठी अधिक वापरलं जातं.

आंतरराष्ट्रीय मान्यता

आंतरराष्ट्रीय स्तरावरही लाल रंगाला धोक्याचा संकेत दाखवण्यासाठी मान्यता मिळाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी लाल रंगाला आपातकालीन आणि सुरक्षा चिन्हासाठी निवडण्यात आलं आहे. यावरून जगभरातून एकता बघायला मिळते. आपण कोणत्याही देशात गेला तरी धोका किंवा इशारा देण्यासाठी लाल रंगच दिसेल.

Web Title: Why red color is used as sign of danger? Know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.