Indian Railway Stations: आपण रेल्वेने तर अनेकदा प्रवास केला असेलच. रेल्वेने प्रवास करताना आपण रेल्वे स्टेशनचं नाव असलेलं पिवळं बोर्डही पाहिलं असेलच. तेव्हा त्यावर आपल्याला समुद्र सपाटीची उंची लिहिलेली दिसली असेल. बोर्डवर स्टेशनच्या नावाखाली हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कधी उर्दूत लिहिलेली असते. पण आपल्याला कधी काही प्रश्न पडलाय का की, या बोर्डवर समुद्र सपाटीची उंची का लिहिलेली असते? जर प्रश्न पडला असेल आणि याचं उत्तर माहीत नसेल तर आता जाणून घेऊया.
समुद्र सपाटीपासून उंचीचा अर्थ काय?
समुद्र सपाटीच्या उंचीपासूनला मीन सी लेव्हल (MSL) असंही म्हटलं जातं. मुळात कोणत्याही जागे उंची जगातील महासागरांच्या सरासरी स्तराच्या आधारावर मोजली जाते. खरंतर समुद्र सपाटी एक कन्सिस्टेंट बेस मेजरमेंटच्या रूपात काम करतं. जेव्हाही आपण एखाद्या रेल्वे स्टेशनच्या साईन बोर्डवर उंची बघता ती ही माहिती रेल्वे संचालनासाठी आणि सुरक्षेवर प्रभाव टाकतो.
जेव्हा रेल्वेचा ट्रॅक तयार केला जातो तेव्हा या गोष्टीची काळजी घेतली जाते की, ट्रॅकचा उतार फार जास्त असू नये. समुद्र सपाटीच्या उंचीच्या आधारावर ट्रॅकचा उतार ठरवला जातो. याने रेल्वेला सहजपणे धावण्यास मदत मिळते आणि दुर्घटना होण्याचा धोका कमी असतो.
जर एखादी रेल्वे उंचीवर जात असेल तर इंजिनाला जास्त मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी रेल्वे उतारात धावत असेल तर इंजिनाला ब्रेक लावावा लागतो. समुद्र तळाच्या उंचीच्या माहितीने इंजिनच्या ड्रायव्हरला हे जाणून घेण्यास मदत मिळते की, त्यांना किती स्पीडने धावायचं आहे किंवा किती ब्रेक लावायचा आहे.
जगभरात उंची मोजण्याचं एक स्टँड्रर्ड मेजरमेंट
समुद्र सपाटी मोजण्याचं एक मानक म्हणून वापरली जाते. जगभरात हीच पद्धत वापरली जाते. कारण समुद्र सपाटी जगभरात एकसारखी आहे. त्यामुळे कुठेही उंची मोजण्यासाठी एक विश्वसनीय आणि सातत्य देणारा रेफरन्स मिळतो.
Web Summary : Railway station boards show sea level height for safe train operation. It aids in determining track gradient, engine power, and braking needs, ensuring smooth and accident-free journeys globally using a standard measurement.
Web Summary : रेलवे स्टेशन बोर्ड पर समुद्र तल की ऊँचाई सुरक्षित ट्रेन संचालन के लिए दर्शाई जाती है। यह ट्रैक ग्रेडिएंट, इंजन की शक्ति और ब्रेकिंग आवश्यकताओं को निर्धारित करने में मदद करता है, जिससे एक मानक माप का उपयोग करके विश्व स्तर पर सुगम और दुर्घटना-मुक्त यात्रा सुनिश्चित होती है।