अंध नसूनही समुद्री डाकूंच्या डोळ्यावर लाल किंवा काळी पट्टी का असते? पाहा यामागचं सायन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:43 IST2025-07-31T15:41:09+5:302025-07-31T15:43:55+5:30
Interesting Facts : काही समुद्री डाकू आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधतात. ही पट्टी लाल किंवा काळ्या रंगाची असते. पण ही पट्टी ते का बांधतात?

अंध नसूनही समुद्री डाकूंच्या डोळ्यावर लाल किंवा काळी पट्टी का असते? पाहा यामागचं सायन्स
Interesting Facts : नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, हॉटस्टार अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हॉलिवूडचे अनेक सिनेमे आणि सीरिज बघायला मिळतात. यात समुद्री डाकूंचेही अनेक सिनेमे असतात. हेच कशाला कॅप्टन स्पॅरोच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन' सिनेमाची सीरिज तर नक्कीच पाहिली असेल. यात समुद्रात लुटमार करणाऱ्या डाकूंचं जीवन दाखवलं जातं. हे सिनेमे बघत असताना एक गोष्ट नोटीस केली असेल की, काही समुद्री डाकू आपल्या एका डोळ्यावर पट्टी बांधतात. ही पट्टी लाल किंवा काळ्या रंगाची असते. पण ही पट्टी ते का बांधतात? असा प्रश्नही कधीना कधी पडला असेल. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
काळ्या पट्टीमागील सायन्स
जेव्हाही आपण अंधारातून प्रकाशाकडे जातो तेव्हा डोळ्यांना अॅडजस्ट करायला काही सेकंद लागतात, जास्त वेळ लागत नाही. पण तेच जर आपण प्रकाशाकडून अंधाराकडे जातो तेव्हा डोळ्यांना अॅडजस्ट करण्यास काही मिनिटं लागतात. जवळपास ५ ते १० मिनिटं.
समुद्री डाकूंना पायरेट्सही म्हटलं जातं. या लोकांना अनेकदा जहाजात वरच्या भागात किंवा खालच्या भागात जावं लागतं. वर लख्खं प्रकाश असतो, तर खालच्या बाजूला खूप अंधार असतो. अशात डोळ्यांना अॅडजस्ट व्हायला वेळ लागतो. यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी बांधतात.
अशात डाकू जसेही अंधारातून प्रकाशाकडे येतात, तेव्हा ते लगेच एका डोळ्यावरची पट्टी फिरवून दुसऱ्या डोळ्यावर ठेवतात. असं करून ते अंधारात योग्यपणे बघू शकतात. कारण तो डोळा आधीच अंधार बघत होता, जेव्हा प्रकाशात आला तर तो डोळा झाकलेला होता. त्यामुळे अंधारात बघण्यासाठी त्याला अॅडजस्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ते अंधारातही व्यवस्थित बघू शकतात.
उजेडातून आल्यावर अंधारात व्यवस्थित दिसायला डोळ्यांना वेळ लागतो. कारण डोळ्यांच्या बुबुळांना प्रकाशानुसार आपला आकार बदलण्यास वेळ लागतो. डोळ्यांच्या बुबुळांना आयरीस म्हटलं जातं. हे प्रकाशानुसार आपला आकार लहान-मोठा करत असतात. जेव्हा आपण प्रकाशात असतो तेव्हा बुबुळं आकुंचन पावतात, तर अंधारात गेल्यावर ते पसरतात. तेच बुबुळं अचानक लहान, मोठे होणं शक्य नसतं. त्यामुळे डाकू या पट्टीचा वापर करतात.