शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आजपर्यंत का कुणीच कैलास पर्वत सर करू शकले नाही, काय आहे कारण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:27 IST

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे.

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे. यांची उंची ८८४८ इतकी आहे. पण कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. असे मानले जाते की, कैलाश पर्वतावर थोडं वर चढल्यावर व्यक्ती दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे मरणाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळेच आजपर्यंत कुणी कैलास पर्वतावर चढू शकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओअॅक्टिवही आहे.

त्यासोबतच असेही म्हटले जाते की, कैलास पर्वताचा स्लोप सुद्धा ६५ डिग्रीपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टचा हाच स्लोप ४०-६० असा आहे. हेच कारण आहे की, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर सहजपणे चढाई करू शकतात, पण कैलास पर्वतावर करू शकत नाहीत.

रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव यांनी सांगितले की, 'जेव्हा मी कैलास पर्वताच्याजवळ गेलो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझं मन हलकं होत गेलं'.

(Image Credit : Welcome NRI)

कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न जवळपास  १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये केला गेला होता. तेव्हा चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचं मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

दरम्यान, असे म्हणतात की, ९२ वर्षांआधी म्हणजेच १९२८ साली एक बौद्ध भिक्खु मिलारेपा कैलास पर्वातावर चढाई करण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ते या पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारे जगातले पहिले व्यक्ती होते. याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल