जीन्स पॅंटवर छोटं पॉकेट का दिलेलं असतं? नाणी किंवा कंडोम नाही तर हे आहे त्याचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 13:16 IST2023-07-29T13:16:05+5:302023-07-29T13:16:37+5:30
तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की, हे छोटं पॉकेट कशासाठी असतं? अनेकांना हेच वाटतं की, छोटं पॉकेट हे चिल्लर पैसे ठेवण्यासाठी असेल. पण याचं मुख्य कारण ते नाहीच.

जीन्स पॅंटवर छोटं पॉकेट का दिलेलं असतं? नाणी किंवा कंडोम नाही तर हे आहे त्याचं कारण...
जीन्सची पॅंट आजकाल सगळेच घालतात. जर तुम्ही कधीना कधी जीन्स घातली असेल तर तुम्हाला त्यावर एक छोटं पॉकेट दिसलं असेल जे समोरच्या मोठ्या पॉकेटच्या वर असतं. तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की, हे छोटं पॉकेट कशासाठी असतं? अनेकांना हेच वाटतं की, छोटं पॉकेट हे चिल्लर पैसे ठेवण्यासाठी असेल. पण याचं मुख्य कारण ते नाहीच.
सोशल मीडियावर अमेरिकी हेवी बॅंड Mötley Crüe च्या एका मेंबरने जीन्सच्या पॉकेटबाबत एक मीम शेअर केलं. मीममध्ये त्याने लिहिलं की, हे पॉकेट एका म्युझिक अॅपमधून होणारी कमाई ठेवण्यासाठी बनवलं आहे. म्हणजे यात कमी पैसे ठेवले जातात. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर यावर वाद सुरू झाला.
बँडच्या टॉमीनुसार, पैसे ठेवण्यासाठी हे पॉकेट बनवण्यात आलं होतं. पण आजच्या काळात किती लोक या पॉकेटच्या वापर पैसे ठेवण्यासाठी करतात? हा प्रश्न आहेच. बरेच लोक यात कंडोम आणि बिलंही ठेवतात. पण मुळात हे पॉकेट या गोष्टींसाठी बनवलंच नव्हतं. चला जाणून घेऊ यामागचं कारण....
जीन्समध्ये छोटे एका खास कारणाने बनवण्यात आले होते. याचं कारण 1890 मध्ये लपलं आहे. त्यावेळी Levi जीन्स काऊबॉयमध्ये फारच फेमस होती. घोडेस्वारी करताना ते त्यांची घड्याळ याच पॉकेटमध्ये ठेवत होती. या घडाळ्यांना चेन होती जी त्यांच्या कंबरेला बांधलेली असायची. पण घड्याळ ते या पॉकेटमध्ये ठेवत होते. आता चेनच्या घड्याळाचं चलन बंद झालं. पण जीन्सवर पॉकेट अजूनही बनवले जातात.