शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

JCB चा रंग पिवळाच का असतो? लाल किंवा निळा का नसतो? वाचा- खास आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 7:22 PM

आपण ज्या मशीनला जेसीबी म्हणता, त्या मशीनचे नाव जेसीबी नाही, ते हे मशीन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे...

रस्त्यावर अथवा इतर कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वेळा जेसीबी दिसतो आणि जेव्हा हा जेसीबी दिसतो तेव्हा अनेकजन काही क्षण त्याच्याकडेच बघत असतात. पण आपण कधी विचार केला आहे का, की प्रत्येक जेसीबीचा रंग एक सारखाच का असतो? म्हणजेच, तो पिवळाच का असतो? आपण इतर काही मशीन्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल की, त्यांत वेगवेगळे रंगही असतात. पण जेसीबी फक्त पिवळ्याच रंगात का असतो?

खरे तर, जेसीबीचा रंग आधीपासूनच पिवळा आहे, असे नाही. एके काळी त्याचा रंग लाल आणि पांढराही असायचा. मात्र, जेसीबी बनवणाऱ्या कंपनीने त्यात बदल केला आणि संपूर्ण जेसीबीला पिवळा रंग देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सर्वच जेसीबींचा रंग सारखाच असतो, म्हणजेच पिवळा असतो. तर आता प्रश्न असा, की पिवळाच का... लाल, निळा किंवा हिरवा का नाही?

जेसीबीचा पिवळा रंग असण्यामागे एक विशेष कारण आहे. जेव्हा हे लाल आणि पांढऱ्या रंगाचे असायचे, तेव्हा कंस्ट्रक्शन साइटवर ते दूरून अथवा उंचावरून व्यवस्थित दिसायला त्रास व्हायचा. रात्रीच्या वेळी तर हे मशील बिल्कुलच दिसत नव्हते. यामुळे जेसीबी तयार करणाऱ्या कंपनीने याचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर कंपनीने जेसीबीसाठी पिवळा रंग निवडला आणि तेव्हापासून सर्व जेसीबी याच रंगात दिसून येते.

जेसीबी कंपनीचे नाव, मशीनचे नाही! - आपण ज्या मशीनला जेसीबी म्हणता, त्या मशीनचे नाव जेसीबी नाही, ते हे मशीन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. हे मशीन भारतातून जवळपास 110 देशांमध्ये निर्यात केले जाते. या मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालकाचे आणि संस्थापकाचे नाव जोसेफ सिरिल बामफोर्ड असे आहे. त्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म जेसीबी असा होतो. या नावावरूनच कंपनीचे नावही जेसीबी असे ठेवण्यात आले आहे. बॅमफोर्डने 1945 मध्ये या कंपनीची स्थापना केली.

जेसीबी संपूर्ण जगात जवळपास 300 प्रकारच्या मशिनरी तयार करते. या कंपनीच्या व्यापार जवळपास 150 देशांमध्ये पसरलेला आहे. माहितीनुसार, जवळपास 22 देशांमध्ये याकंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. महत्वाचे म्हणजे, जीसीबी हे नाव एवढे प्रसिद्ध झाले आहे, की ब्रिटनच्या प्रसिद्ध ऑक्सफोर्ड डिक्शनरीनेही हे नाव आपल्या शब्दकोशात ट्रेड मार्कच्या स्वरुपात सामील केले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेKnowledge Centerज्ञानाचं केंद्र