पानाला चुना आणि काथ का लावला जातो? विडा खाता पण हे महत्वाचं कारण माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:52 IST2025-04-15T16:17:45+5:302025-04-16T09:52:23+5:30

Interesting Facts : एक्सपर्ट सांगतात की, खायच्या पानावर अनेक रिसर्च झाले, ज्यातून समोर आलं आहे की, पान तंबाखूसोबत कधी खाऊ नये.

Why is lime and catechu used in Paan, know the reasons | पानाला चुना आणि काथ का लावला जातो? विडा खाता पण हे महत्वाचं कारण माहिती आहे का?

पानाला चुना आणि काथ का लावला जातो? विडा खाता पण हे महत्वाचं कारण माहिती आहे का?

Interesting Facts  :  खास सणांवेळी किंवा लग्नांमध्ये पान खाण्याचा आनंद बरेच लोक घेत असतात. तसेच जेवण झाल्यावर रोज पान खाण्याची काही लोकांना सवय सुद्धा असते. तुम्ही सुद्धा अनेकदा मसाला पान खाल्लं असेलच. पण तुम्हाला माहीत नसेल की, पानामध्ये चुना, काथ आणि सुपारी का टाकली जाते. एक्सपर्ट सांगतात की, खायच्या पानावर अनेक रिसर्च झाले, ज्यातून समोर आलं आहे की, पान तंबाखूसोबत कधी खाऊ नये.

तंबाखूमुळे तोंडात अल्सर आणि कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. ज्यामुळे औषधी गुण असलेल्या खायच्या पानाची प्रतिमा खराब झाली. पानामध्ये असे काही नॅचरल तत्व असतात जे कॅन्सरसोबत लढण्यास मदत करतात. वैज्ञानिक आता याबाबत रिसर्च करत आहेत आणि अशा अॅंटी- कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर रोखणाऱ्या तत्वांची ओळख पटवत आहेत.

वैज्ञानिकांचं मत आहे की, पानामध्ये नॅचरली हलके आम्लीय गुण असतात. जे सुपारी, काथ आणि चुना लावून संतुलित केले जातात. खासकरून चुना शरीरात कॅल्शिअम वाढवतो. सुपारी खाताना काळजी घेण्याची गरज आहे. कधीच ओली किंवा सडलेली सुपारी खाऊ नये. कारण यातील फंगस कॅन्सरचं कारण ठरू शकतं. नेहमीच वाळलेली आणि स्वच्छ सुपारी खावी.

जर मगही पानाबाबत सांगायचं तर हे पान आपली टेस्ट आणि गुणवत्तेसाठी ओळखलं जातं. भारत सरकारनं २०१८ मध्ये GI टॅगनं सन्मानित केलं. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या पानाला चांगली मागणी आहे. ज्यामुळे शेतकरी आणि व्यापारांचा मोठा फायदा होत आहे. 

Web Title: Why is lime and catechu used in Paan, know the reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.