शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

एका डझनात नेहमी 12च वस्तू का असतात, 10 किंवा 11 का नाही? समजून घ्या यामागचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:29 IST

Why 12 means dozen : या 12च्या मागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे गणित, इतिहास आणि विज्ञानाचं एक मनोरंजक कारण दडलेलं आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत.

Why 12 means dozen : आपण जर बाजारात जात असाल आणि केळी घायची असतील तर ती आपल्याला किलोप्रमाणे नाही तर डझनानुसार मिळतात. अशा अनेक वस्तू असतात ज्या डझनानी मिळतात. डझनभर केळी म्हणजे 12, पण आपण कधी विचार केलाय का की, एक डझनामध्ये 12च वस्तूच का असतात? 10 नाही, 11 नाही थेट 12! अंडी असोत, केळी असोत किंवा मिठाई सर्वकाही ‘डझन’मध्येच मोजलं जातं. पण या 12च्या मागे फक्त परंपरा नाही, तर त्यामागे गणित, इतिहास आणि विज्ञानाचं एक मनोरंजक कारण दडलेलं आहे. तेच आज आपण समजून घेणार आहोत.

‘डझन’ शब्द आला कुठून?

मुळात ‘डझन’ हा शब्द इंग्रजीतील 'dozen' या शब्दातून आला आहे आणि  'dozen' हा शब्द लॅटिन भाषेतील 'duodecim' पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ 'बारा' म्हणजेच 12 असा होतो. म्हणजे भाषिकदृष्ट्या 'डझन' म्हणजेच '12'. हे पुढे अजून खोलात समजून घेऊ.

प्राचीन गणनेचं रहस्य

आज आपण 10 वर आधारित दशमान पद्धत (Decimal System) वापरतो. म्हणजे 10, 100, 1000 इत्यादी. पण प्राचीन काळात अनेक संस्कृतींमध्ये 12 वर आधारित पद्धत वापरली जात होती. इजिप्त, रोम आणि बाबिलोन या प्राचीन संस्कृतींमध्ये 12 ला एक 'पूर्ण चक्र' मानलं जायचं. कारण एका वर्षात 12 महिने असतात. घड्याळात 12 तासांचा चक्र असतं. एक वर्तुळ 12 समान भागांमध्ये विभागणं सोपं असतं. म्हणून 12 ला पूर्णता आणि संतुलनाचं प्रतीक मानलं जात होतं. 

व्यापारात 12चं महत्त्व

प्राचीन युरोपात बाजारात वस्तू विकताना व्यापारांनी 12 ला मोजमापाचं व्यावहारिक एकक म्हणून स्वीकारलं. 12 वस्तूंचे अर्धे, चतुर्थांश किंवा सहावे भाग काढणं सोपं होतं, त्यामुळे हिशेबात चूक होण्याची शक्यता कमी व्हायची. हळूहळू ही पद्धत इतकी रूढ झाली की 12 वस्तू = एक डझन.

‘बेकर्स डझन’ म्हणजे काय?

काही मीडिया रिपोर्टनुसार, एक काळ असा होता की ‘बेकर्स डझन’ म्हणजे 13 वस्तू मानल्या जात होत्या. इंग्लंडमध्ये बेकरीवाले जेव्हा बन किंवा ब्रेड विकत असत, तेव्हा ते एका डझनमध्ये 13 वस्तू देत असत. कारण वजनात थोडीफार कमतरता निघाल्यास ग्राहकाला नुकसान होऊ नये. म्हणून 13वा तुकडा बोनस म्हणून दिला जात असे.

पण 12 ही संख्या पूर्ण वाटते. म्हणून जेव्हा एखाद्या वस्तूंचा समूह 12चा असतो, तेव्हा तो आपल्याला 'पूर्ण' वाटतो. याच कारणानं अंडी असो किंवा केळी त्यांची गिनती 12 झाली तेव्हाच ‘एक डझन’ मानली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Why a dozen always contains 12 items: The math behind it.

Web Summary : A dozen equals 12 due to ancient counting systems, trade practices, and perceived completeness. Ancient cultures favored 12, reflected in months and clock hours. Dividing 12 was practical for traders, solidifying its use.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके