Interesting Facts : अनेकदा असं होतं की, काही गोष्टी आपल्या समोर येतात, आपण बघत असतो. पण आपल्या धावपळीच्या आयुष्यात किंवा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे आपण त्यांकडे लक्ष देत नाही आणि त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. आपल्याही मनात अशा काही गोष्टी आल्या असतील, ज्या तुम्ही कधी ना कधी पाहिल्या असतील, पण त्यामागचे कारण कधी शोधले नसेल. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जी कदाचित तुमच्यासोबत घडली असेल, पण तिच्यामागचे कारण तुम्ही कधी विचारात घेतले नसेल. आज आपण जाणून घेणार आहोत की अनेक हॉटेल्समध्ये १३ क्रमांकाची खोली का नसते.
हॉटेलमध्ये १३ नंबरची खोली का नसते?
याबद्दल सांगण्यापूर्वी हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की असे सर्वच हॉटेल्समध्ये आढळत नाही. फक्त काही हॉटेल्समध्येच आपल्याला हे पाहायला मिळतं. म्हणजेच हा कोणताही नियम नाही. मग प्रश्न असा पडतो की असे का होते? खरं तर अनेक लोक १३ हा अंक अत्यंत अशुभ मानतात. या अंकाला नकारात्मक ऊर्जेशी जोडले जाते. याच कारणामुळे अनेक हॉटेल्समध्ये १३ क्रमांकाची खोली ठेवली जात नाही. असे नाही की प्रत्येक हॉटेलचा मालक अशीच श्रद्धा बाळगतो, म्हणून तो १३ नंबरची खोली बांधत नाही. अनेकदा असे होते की हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांपैकी बरेच जण १३ नंबरची खोली घेण्यास नकार देतात. त्यामुळे ती खोली रिकामी राहून हॉटेल मालकाचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच काही हॉटेल्स १३ क्रमांक वगळतात.
लोकांना ‘ट्रिस्कायडेकाफोबिया’ असतो?
१३ या अंकाच्या भीतीला ‘ट्रिस्कायडेकाफोबिया’ असे म्हणतात. या फोबियामध्ये लोकांना १३ या अंकाची तीव्र भीती वाटते. हा अंक अशुभ आहे, अशी त्यांची ठाम धारणा असते. त्यामुळे १३ नंबर पाहिल्यावर त्यांना घबराट, अस्वस्थता जाणवते. काही वेळा तर हृदयाची धडधडही वाढते. याच मानसिक भीतीमुळे अनेक लोक १३ नंबरशी संबंधित गोष्टी टाळतात आणि त्याचा परिणाम हॉटेल्समधील खोली क्रमांकांवरही दिसून येतो.
Web Summary : Many hotels avoid the number 13 due to superstition and fear of negative energy. Guests often refuse rooms with this number, leading to potential losses for hotels. This fear, known as 'Triskaidekaphobia', significantly impacts hotel room numbering.
Web Summary : कई होटल अंधविश्वास और नकारात्मक ऊर्जा के डर से 13 नंबर से बचते हैं। ग्राहक अक्सर इस नंबर के कमरे लेने से इनकार करते हैं, जिससे होटलों को नुकसान होता है। 'ट्रिस्काइडेकाफोबिया' नामक यह डर होटल के कमरा नंबर पर असर डालता है।