रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:48 IST2024-12-17T12:47:39+5:302024-12-17T12:48:47+5:30
Why Dogs Chase Bikes Or Car : तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, कुत्री रस्त्यावरून जात असलेल्या गाड्यांच्या मागे का लागतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...

रस्त्याने जात असलेल्या गाडीमागे अचानक का धावतात कुत्री? कारण वाचून व्हाल अवाक्!
Why Dogs Chase Bikes Or Car: अनेकदा बघायला मिळतं की, रस्त्यावरून टू व्हिलरने किंवा कारने जात असताना मोकट कुत्री मागे लागतात. आश्चर्याची बाब म्हणजे रस्त्यावरून पायी चालत असलेल्या लोकांना मोकाट कुत्री काहीच करत नाही. पण धावत्या गाडीमागे लागतात. अशात लोक अधिक वेगाने गाडी चालवतात आणि काही दुर्घटनाही घडतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, कुत्री रस्त्यावरून जात असलेल्या गाड्यांच्या मागे का लागतात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
गाडी मागे का धावतात कुत्री?
कल्पना करा की, तुम्ही तुमच्या गाडीने रस्त्याने जात आहात. अचानक काही कुत्री तुमच्या मागे धावू लागतात. अशात घाबरून तुम्ही गाडीचा स्पीड वाढवता, तुम्हाला माहीत आहे का की, कुत्र्याला तुमच्याकडून काय समस्या आहे? क्वचितच याचं उत्तर कुणाकडे असेल. मुळात कुत्र्याला तुमच्यापासून काही समस्या नसते, तर गाडीमधून येणाऱ्या एका खास वासामुळे त्यांना समस्या असते.
कुत्र्यांचं नाक हे मनुष्यांच्या नाकापेक्षा खूप वेगळं असतं. ते फार दुरूनही एखाद्या गोष्टीचा वास किंवा गंध ओळखू शकतात. जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणांहून गाडी फिरत असते तेव्हा गाडीच्या चाकांना कुत्र्यांची घाण लागते. कुत्री या वासाला ओळखतात आणि असं वाटतं की, त्यांच्या एरियात दुसरा कुत्रा आला आहे. हेच कारण आहे की, ते तुमच्या गाडीचा पाठलाग करतात.
तुम्ही अनेकदा कुत्र्यांना गाडीच्या टायरवर लघवी करताना पाहिलं असेल. ते असं करतात कारण ते त्याचा गंध टायरवर सोडून दुसऱ्या कुत्र्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतात की, हा एरिया त्यांचा आहे. जेव्हा तुमची गाडी एखाद्या भागातून जात असेल तेव्हा दुसऱ्या कुत्र्यांना टायरवरील त्या कुत्र्याच्या लघवीचा वास येतो ज्याने टायरवर आधी लघवी केली होती. याकारणाने ते तुमच्या गाडीचा पाठलाग करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, त्यांच्या एरियामध्ये बाहेरचा कुत्रा आला आहे.
आणखी एक कारण...
कुत्रे फार भावूक प्राणी असतात आणि त्यांचं त्यांच्या साथीदारांसोबत खास नातं असतं. जर एखाद्या गाडीमुळे त्यांच्या साथीदाराला इजा किंवा जखम झाली असेल किंवा मृत्यू झाला असेल तर कुत्र्यांना ती गाडी नेहमीसाठी लक्षात राहते. या अनुभवामुळेही ते गाडीला बघून भुंकतात किंवा पाठलाग करतात. हे त्यांच्यासाठी एकप्रकारे सूड घेण्यासारखं असतं.