मॉल्स किंवा रेस्टॉरन्टमध्ये पाय ठेवताच जोराची हवा का लागते? जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:13 IST2025-02-22T12:12:17+5:302025-02-22T12:13:02+5:30
Why Strong Wind At Mall Entrance: ही हवा इतकी जोरात येते की, केसही विस्कटीत होतात आणि कपडेही उडतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं?

मॉल्स किंवा रेस्टॉरन्टमध्ये पाय ठेवताच जोराची हवा का लागते? जाणून घ्या यामागचं कारण...
Why Strong Wind At Mall Entrance: वीकेंडला तुम्ही एखाद्या मॉलमध्ये, रेस्टॉरन्टमध्ये किंवा एखाद्या मोठ्या शॉपिंग सेंटरमध्ये जात असालच. यावेळी तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, मॉल किंवा रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश करताना एक थंड हवेची झुळूक अंगावर येते. ही हवा इतकी जोरात येते की, केसही विस्कटीत होतात आणि कपडेही उडतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, असं का होतं? यामागचं कारण काय आहे? नसेल केला विचार तर आता जाणून घेऊया.
व्हेंटिलेशन सिस्टीम आणि एअर कर्टन
जेव्हा आपण एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये प्रवेश करताना तेथील व्हेंटिलेशन सिस्टीम अशाप्रकारे बनवली जाते की, आतील हवा शुद्ध आणि थंडी रहावी. यासाठी एअर कंडीशनिंग सिस्टीमचा वापर केला जातो. जो आतील गरम गवा बाहेर काढतो आणि थंडी हवा आत घेतो. पण जेव्हा दरवाजे उघडले जातात तेव्हा बाहेरची गरम हवा आत येण्याचा प्रयत्न करते. यामुळे एअर कडींशनिंग सिस्टीमवर दबाव पडतो आणि आतील तापमान वाढतं.
ही समस्या रोखण्यासाठी इमारतींमध्ये एका खास टेक्नीकचा वापर केला जातो. ज्याला एअर कर्टन म्हणजे हवेचा पडदा म्हटलं जातं. एअर कर्टन एका अदृश्य पडद्यासारखं काम करते. दरवाजाच्या वरच्या बाजूला लावलेल्या या सिस्टीममधून जोरात खाली हवा सोडली जाते. ही हवा आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या मधे एक भींत बनते. ज्यामुळे बाहेरची गरम हवा आत येत नाही आणि आतील थंड हवा बाहेर जात नाही.
कशी काम करते एअर कर्टन सिस्टीम?
एअर कर्टन हे एक इलेक्ट्रिक डिवाइस आहे. जे दरवाजाच्या वरच्या बाजूला लावलं असतं. जेव्हा हे सुरू होतं तेव्हा त्यातून वेगानं हवा सोडली जाते. ही हवा खालच्या बाजूनं वाहते. या हवेचा एक अदृश्य पडदा तयार होतो. आतील हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची गरम हवा आत येऊ नये यासाठी ही सिस्टीम असते. अशाप्रकारे इमारतीच्या आतील तापमान स्थिर राहतं आणि एअर कंडीशनिंग सिस्टीमला जास्त मेहनत करावी लागत नाही.
एअर कर्टनचे इतर फायदे
ऊर्जेची बचत - एअर कर्टनमुळे एअर कंडीशनिंग सिस्टीमवर कमी दबाव पडतो, ज्यामुळे विजेचा वापरही कमी होतो.
धूळ आणि कीटकांपासून सुरक्षा - एअर कर्टनमुळे धूळ, डास, माश्या आणि इतर कीटक आत येत नाहीत. यामुळे इमारतीच्या आतील वातावरण स्वच्छ राहतं.
एअर कर्टनचा वापर कुठे कुठे केला जातो?
एअर कर्टनचा वापर केवळ मॉल्स आणि रेस्टॉरन्टमध्येच केला जातो असं नाही. ही सिस्टीम वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाते. जसे की, हॉस्पिटल, लेबॉरेटरीज, फॅक्टरी इतकंच काय तर घरांमध्येही वापरली जाते. ज्या ठिकाणी तापमान कंट्रोल करण्याची गरज असते तिथे याचा वापर केला जातो.