शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांच्या नखांवर पांढरे डाग कशाचे असतात? पाहिले तर असतील पण माहीत नसेल कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:08 IST

Nail Facts : आज आम्ही आपल्याला नखांबाबत असं काही सांगणार आहोत, जे आपण नोटीस केलं असेल, पण त्यामागचं कारण माहिती नसेल. 

Nail Facts : रोज सकाळी झोपेतून उठल्यावर रात्री झोपेपर्यंत आपल्याला अशा अशा गोष्टी जाणवतात ज्या सामान्य नसतात. पण आपण त्यामागील कारणं जाणून घेण्याचा फार प्रयत्न करत नाही. या गोष्टींकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. आपण आपल्या शरीराबाबत देखील असंच करतो. पण जर शरीरात काही बदल दिसत असतील तर आपल्याला त्याबाबत प्रश्न पडला पाहिजे किंवा मग त्याबाबत जाणून घेतलं गेलं पाहिजे. पण लोक सहजपणे कानाडोळा करतात. आज आम्ही आपल्याला एका अशाच गोष्टीबाबत सांगणार आहोत. आम्ही आपल्याला नखांबाबत असं काही सांगणार आहोत, जे आपण नोटीस केलं असेल, पण त्यामागचं कारण माहिती नसेल. 

नखांवर पांढरा डाग कशाचा? 

आपण पाहिलं असेल की, अनेक लोकांच्या नखांवर एक पांढरा डाग असतो. जिथून नखं उगवतात, सामान्यपणे तिथे हा पांढरा डाग बघायला मिळतो. कदाचित आपल्या नखांवर देखील हा पांढरा डाग असेल. पण यामागचं कारण आपल्याला माहीत नसेल. हा डाग मुळात ल्यूकोनीशियामुळे होतो. जो एक कॉमन आजार आहे. जिथून नखं उगवतात, तिथे जर हा डाग असेल तर तो ल्यूकोनीशियामुळे असतो. तेच जर पांढरे डाग नखांच्या खालच्या बाजूला असलेल्या त्वचेवर असतील तर ते अपेरंट ल्यूकोनीशियामुळे येतात. तेच जर हेच डाग नखांवर असेल तर ते स्यूडोल्यूकोनीशियामुळे दिसतात.

कोणत्या कारणांनी होतो ल्यूकोनीशिया?

आता आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ल्यूकोनीशिया कोणत्या कारणाने होतो. तर यामागचं एक कारण अॅलर्जी असू शकतं. नखांवर वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्समुळे अॅलर्जी होऊ शकते आणि यामुळे असे डाग येतात. त्याशिवाय एखाद्या जखमेमुळेही असे डाग तयार होऊ शकतात. कधी कधी एखाद्या फंगल इन्फेक्शनमुळेही नखांवर असे पांढरे डाग येऊ शकतात. तसेच अनेकदा औषधांच्या साइड इफेक्टमुळेही असं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : White spots on nails: Causes, types, and what they indicate.

Web Summary : White spots on nails, often ignored, can indicate underlying issues. Leukonychia, allergies, injuries, fungal infections, or medication side effects are potential causes. Identifying the location helps determine the cause and appropriate action.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके