अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:17 IST2025-08-04T17:10:38+5:302025-08-04T17:17:43+5:30
Why do we yawn when see other : जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं?

अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं?
Why do we yawn when see other : गाडीतून प्रवास करत असताना आपल्यालाही अनुभव आला असेल की, कार ड्रायव्हरसोबत समोर बसलेल्या व्यक्तीला झोपण्यास सक्त मनाई असते. कारण काय तर बाजूच्या व्यक्तीला बघून ड्रायव्हरला सुद्धा झोप येऊ शकते. असाच एक वेगळा प्रकार म्हणजे जांभईचा. जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं? कुणालाही हे विचित्र वाटणारंच आहे. अनेकांना हा प्रश्नही पडत असेल, पण सहजपणे उत्तर मिळत नसेल. आज आपण यामागचं वैज्ञानिक कारण समजून घेणार आहोत.
का होतं असं?
दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला सुद्धा कधीना कधी जांभई आली असेल आणि प्रश्नही पडला असेल की, असं का होतं? दुसऱ्यांना बघून आपल्यालाही जांभई येणं एखादं बॅक्टेरिअल किंवा व्हायरल इन्फेक्शन तर नाही ना? असंही वाटलं असू शकतं. पण असं काही नाहीये. मुळात असं होण्याचा संबंध मेंदुशी आहे.
इटालियन वैज्ञानिकानुसार, याच्यामागे एका खास न्यूरॉनचा हात असतो. या न्यूरॉनला 'मिरर न्यूरॉन' असं म्हणतात. जसं की, नावावरून समजतं की, हे न्यूरॉन व्यक्तीची प्रतिछाया तयार करतात.
या न्यूरॉनचा संबंध काहीही नवीन शिकणे, नक्कल करणे आणि सहानुभूती दाखवण्यासंबंधी आहे. याचा शोध जियाकोमो रिजोलाटी नावाच्या न्यूरो बायोलॉजिस्टने लावला होता. मनुष्यावर जेव्हा याबाबत अभ्यास झाला तेव्हा समजलं की, हे न्यूरॉन तंतोतंत तेच काम करतात जे समोरची व्यक्ती करत असेल. दुसऱ्या व्यक्तीचे न्यूरॉन अॅक्टिव होऊन त्यांनाही तसंच करण्यास सांगतात.
मिरर न्यूरॉन मेंदुचे चार भाग, प्री मोटर, इंफीरियर फ्रंटल गायरस, पेराइटल लोब आणि सुपीरियल टेम्पोरल सुलकसमध्ये आढळतात. मेंदुच्या चारही भागांच्या काम करण्याच्या क्षमतेवर हे न्यूरॉन आपला प्रभाव पाडतात. पण ऑटिज्म, सीज़ोफ्रीनिया आणि मेंदुसंबंधी आजारामध्ये हे न्यूरॉन प्रभावित होतात आणि ते आधीसारखं प्रभावी काम करत नाहीत.