पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:52 IST2025-08-05T16:46:58+5:302025-08-05T16:52:35+5:30
Expiry Date On Water Bottle : जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.

पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट?
Expiry Date On Water Bottle : उन्हाळा असो वा नसो पाण्याच्या बॉटल विकत घेण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. पावसाळा असला तरी भरपूर लोक प्रवास करताना किंवा कुठे बाहेर गेलेले असताना पाण्याची बॉटल विकत घेऊन पाणी पितात. या बॉटलमधील पाणी शुद्ध आणि हेल्दी मानलं जातं. हे पाणी बेकारही होत नाही. मग जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. चला तर पाहुया यामागचं कारण...
पाण्याची नसते एक्सपायरी डेट, मग...?
जर पाण्याची एक्सपायरी डेट नसते तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिली जातं? तर पाण्याची जरी एक्सपायरी डेट नसली तरी, पाणी स्टोर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बॉटलची नक्कीच एक्सपायरी डेट असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.
पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?
सोबतच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते कारण ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि ते पिणं नुकसानकारक ठरू शकतं.
बॉटलची एक्सपायरी डेट
एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते आणि याचं सेवन सुरक्षित असू शकत नाही. जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ग्राहकांनी त्यातील पाणी पिऊ नये. हेही खरं आहे की, एका कालावधीनंतर प्लास्टिक पाण्यात मिक्स होणं सुरू होतं आणि याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.