कांदा कापताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का लागतात? कारण फारच इंटरेस्टींग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:07 IST2025-08-13T15:00:26+5:302025-08-13T15:07:39+5:30

Why Onions Make You Cry : कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात.

Why do tears fall when cutting onions know the reason | कांदा कापताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का लागतात? कारण फारच इंटरेस्टींग...

कांदा कापताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा का लागतात? कारण फारच इंटरेस्टींग...

Why Onions Make You Cry : कांदा रोज वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांमध्ये टाकला जातो. कधी कांद्याची पेस्ट वापरली जाते, तर कधी कांदा कापून वापरला जातो. कांदा कापणं हे किचनमधील एक रोजचं काम असतं. आपणही कांदा कापत असाल, पण कधी विचार केलाय का की, तो कापत असताना डोळ्यातून पाणी का येतं?

कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात. जळजळ होते. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. खरंतर यामागे एक वैज्ञानिक कारण असतं. तेच आपण पाहणार आहोत.

काय आहे कारण?

कांद्याच्या लेअरमध्ये खूप बारीक कोशिका असतात, ज्यात सल्फरयुक्त तत्व आणि एंझाइम असतात. तशा तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. पण जेव्हा कांदा कापला जातो तेव्हा दोन्ही तत्व एकत्र येतात. त्यामुळे एक गॅस तयार होतो, ज्याला लॅक्रिमेटरी फॅक्टर म्हटलं जातं. हे डोळ्यांतून पाणी येण्याचं आणि जळजळ होण्याचं कारण ठरतं. 

आपले डोळे खूप संवेदनशील असतात. कोणत्याही प्रकारचं रसायन किंवा गॅसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लगेच प्रतिक्रिया देतात. जेव्हा कांद्यातून निघणारा गॅस डोळ्यांच्या संपर्कात येतो, तेव्हा डोळे याला एक घातक पदार्थ मानतात. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी डोळ्यांच्या लॅक्रिमल ग्रंथी लगेच अश्रू सोडतात. अश्रूंचं काम हा गॅस धुवून बाहेर काढणं असतं. जेणेकरून डोळे सुरक्षित राहतील.

कांद्याचं डिफेन्स मेकॅनिज्म

वैज्ञानिकांचं मत आहे की, हे कांद्याचं एक नॅचरल डिफेन्स मेकॅनिज्म असतं. निसर्गानं कांद्याला असं रसायन तयार करण्याची क्षमता दिली आहे, जेणेकरून कीटक किंवा प्राण्यांपासून त्याचं नुकसान होऊ नये. डोळ्यांमध्ये जळजळ करणारा हा गॅस मनुष्यांसोबतच, प्राण्यांना सुद्धा दूर ठेवतो.

काय कराल उपाय?

- कापण्याआधी कांदा १० ते १५ मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड कांद्यातून गॅस कमी प्रमाणात निघतो.

- जास्त धारदार चाकूनं कांदा कापू शकता. असं केल्यानं कांद्याच्या कोशिका कमी तुटतात आणि गॅस कमी निघतो.

- कांदा कापत असताना जवळ पाण्यानं भरलेली एक वाटी ठेवा. कांदा पाण्यात बुडवा मग कापा. असं केल्यास गॅस पाण्यात मिक्स होईल.
 

Web Title: Why do tears fall when cutting onions know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.