जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:31 IST2025-01-02T12:20:17+5:302025-01-02T12:31:08+5:30

History of Denim Pockets: हे छोटं पॉकेट जीन्समध्ये कशासाठी दिलेलं असतं? हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना हे माहीत नाही की, या छोट्या पॉकेटचा इतिहास खूप जुना आणि इंटरेस्टींग आहे.

Why Do Jeans Have That Tiny Pocket? know the history and its work | जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

History of Denim Pocket: आजकाल जीन्सचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. लहान मुलं असोत, तरूण, वयस्क वृद्ध वा महिला असो सगळेच जीन्सचा वापर करतात. तुम्हीही जीन्स अनेकदा वापरली असेल. अशात तुमच्या हेही लक्षात आलं असेल की, सामान्यपणे सगळ्याच जीन्स पॅंटला एक छोटं पॉकेट असतं. ज्यात दोन ते तीन नाण्यांशिवाय दुसरं काही ठेवलं जाऊ शकत नाही. अशात हे छोटं पॉकेट जीन्समध्ये कशासाठी दिलेलं असतं? हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना हे माहीत नाही की, या छोट्या पॉकेटचा इतिहास खूप जुना आणि इंटरेस्टींग आहे. चला जाणून घेऊ याचा उद्देश...

कशासाठी असतं छोटं पॉकेट?

जीन्समधील या छोट्या पॉकेटला 'वॉच पॉकेट' म्हटलं जातं. आता नावावरून तुम्हाला काहीतरी हींट मिळाली असेलच. तर १९व्या शतकात जेव्हा जीन्सचा आविष्कार झाला होता, तेव्हा घड्याळ मनगटावर बांधलं जात नव्हतं. घड्याळ 'वॉच पॉकेट' मध्ये ठेवलं जात होतं. जीन्सचं हे छोटं पॉकेट खासकरून पॉकेट वॉचसाठी डिझाइन करण्यात आलं होतं. हे पॉकेट छोटं ठेवण्यात आलं, जेणेकरून त्यात घड्याळ सुरक्षित रहावं. काम करताना ते खाली पडू नये. पण हा इतिहास इतक्यावरच संपतो असं नाही. अनेकांना हेही माहीत नाही की, जीन्स त्यावेळी सगळ्यांसाठीच बनवण्यात आलेली नव्हती. काही खास लोकच जीन्सचा वापर करत होते.

कुणासाठी बनवली होती जीन्स?

जीन्सचा आविष्कार मुख्यपणे मजुरांसाठी करण्यात आला होता. त्यावेळी मजुरांना फॅक्टरीमध्ये खूप मेहनत करावी लागत होती. त्यामुळे त्यांना अशा पॅंटची गरज होती, जी मजबूत असेल आणि सहजपणे फाटू नये. याच कारणानं जीन्स बनवण्यात आली होती. जीन्सचा कापड जाड असतो. त्यामुळे तो सहज फाटतही नाही आणि लवकर खराबही होत नाही. मजुरांकडे घड्याळ ठेवण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा नव्हती. अशात जीन्समध्ये एक छोटं पॉकेट देण्यात आलं. जेणेकरून मजूर आपलं घड्याळ त्यात सुरक्षित ठेवू शकतील.

स्टाइल स्टेटमेंट

आजकालचे लोक पॉकेट वॉचचा फार कमी वापर करतात. तरीही जीन्समध्ये हे छोटं पॉकेट दिलं जातं. याचं कारण हे पॉकेट आता फॅशन बनलं आहे. अनेक लोक या छोट्या पॉकेटकडे स्टाइल स्टेटमेंट म्हणून बघतात. जर हे जीन्समध्ये हे पॉकेट नसेल तर काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. काही लोक आता या पॉकेटचा वापर नाणी, चावी किंवा इतर काही छोट्या वस्तू ठेवण्यासाठी करतात.
 

Web Title: Why Do Jeans Have That Tiny Pocket? know the history and its work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.