Indian Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. प्रवाशांसाठी रेल्वे हे एक फारच फायदेशीर असं साधन आहे. भारतीय रेल्वेकडून रोज जवळपास १३५२३ रेल्वे चालवल्या जातात. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. वेगवेगळ्या रंगांच्या रेल्वे आपण पाहिल्या असतील. पण आपण कधी विचार केलाय का की, रेल्वेचे कोच वेगवेगळ्या रंगाचे का असतात? यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
निळ्या रंगाचे कोच
जास्तीत जास्त रेल्वेंमध्ये निळ्या रंगांच्या डब्यांचा वापर केला जातो. यांना integral coach म्हणतात. Integral coach ची फॅक्टरी तामिळनाडूमध्ये आहे. जी भारतीय रेल्वे अंतर्गत काम करते. यात जनरल, एसीपासून ते वेगवेगळे कोच तयार केले जातात. हे कोच लोखंडापासून तयार केलेले असतात. अशाप्रकारचे कोच मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट सगळ्याच रेल्वेंमध्ये लावले जातात. निळ्या कोचच्या रेल्वेचा स्पीड प्रति तास ७० ते १४० किलोमीटर इतका असतो.
लाल रंगाचे कोच
हे खासप्रकारचे डबे असतात. यांना LSB कोच असंही म्हटलं जातं. हे कोच अॅल्यूमिनिअमपासून बनवलेले असतात. दुसऱ्या कोचच्या तुलनेत यांचं वजन हलकं असतं. हेच कारण आहे की, लाल डबे असलेल्या रेल्वेचा स्पीड अधिक असतो. लाल डब्यांच्या रेल्वेचा स्पीड निळ्या डब्यांच्या रेल्वेपेक्षा नेहमी जास्त असतो. या डब्यांच्या रेल्वेचा स्पीड प्रति तास १६० ते २०० किलोमीटर इतका असतो. या रेल्वेमध्ये डिस्क ब्रेकही असतात. असे डबे जास्तकरून शताब्दी किंवा राजधानीसारख्या रेल्वेत लावलेले असतात. सध्या या कोचची निर्मिती पंजाबच्या कपूरथला येथे केली जात आहे.
हिरव्या रंगाचे कोच
हिरव्या रंगाच्या कोचचा वापर गरीब रथ रेल्वेत केला जातो. आधी नॅरो-गेज ट्रॅकवर धावणाऱ्या रेल्वेमध्ये हिरव्या रंगाचे कोच वापरले जात होते. या रेल्वे आपल्याला अनेक सुंदर पेंटिंग सुद्धा बघायला मिळतात. या रेल्वेचा स्पीड १६० ते २०० किलोमीटर प्रति तास असतो.
भुरक्या रंगाचे कोच
भुरक्या रंगाच्या कोचचा वापर छोट्या लाइन्सवर धावणाऱ्या मीटर गेज रेल्वेंमध्ये केला जातो. या रेल्वे लांब पल्ल्याच्या असतात. तसेच कोच आरामदायक असतात. यात इतर रेल्वेंच्या तुलनेत जरा जास्त सुविधा दिल्या जातात. या रेल्वेत जागाही बरीच असते. या रेल्वेंचा स्पीड ७० ते १४ किलोमीटर प्रति तास असतो.
Web Summary : Indian Railways uses different colored coaches for specific train types. Blue coaches are common for Mail/Express trains. Red LHB coaches are for faster trains like Rajdhani/Shatabdi. Green indicates Garib Rath, and grey for meter gauge trains.
Web Summary : भारतीय रेलवे विशिष्ट प्रकार की ट्रेनों के लिए अलग-अलग रंग के कोच का उपयोग करती है। मेल/एक्सप्रेस ट्रेनों के लिए नीले कोच सामान्य हैं। लाल एलएचबी कोच राजधानी/शताब्दी जैसी तेज़ ट्रेनों के लिए हैं। हरा रंग गरीब रथ को दर्शाता है, और मीटर गेज ट्रेनों के लिए ग्रे।