हॉटेलमधील बेडवर जास्तकरून पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:52 IST2024-12-26T16:38:39+5:302024-12-26T16:52:46+5:30
जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल.

हॉटेलमधील बेडवर जास्तकरून पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? जाणून घ्या कारण...
कधी कुठे प्लानिंग करून कुठे फिरायला गेल्यावर सामान्यपणे सगळेच हॉटेलमध्ये थांबतात. सुंदर, शांत आणि स्वस्तात चांगल्या सुविधा देणाऱ्या हॉटेलची निवड सगळेच करतात. तुम्हीही कधीना कधी फिरायला गेल्यावर हॉटेलमध्ये थांबले असालच. जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाची चादर असतात. पण जास्तीत जास्त हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाचीच बेडशीट का असते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण याचं उत्तर तुम्हाला माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शांतता
पांढरा रंग हा शांततेचं प्रतीन मानला जातो. मनाला आणि डोळ्यांना जेवढी शांतता पांढरा रंग पाहून मिळते, तेवढी इतर कोणताही रंग पाहून मिळत नाही. तसेच या रंगाला पवित्र मानलं जातं. त्यामुळेच ग्राहकांना शांतता जाणवावी म्हणून बेडशीट, पडदेही जास्तकरून पांढरे असतात.
मळ-डाग लगेच दिसतात
बेडशीटचा रंग पांढरा असल्याने ती घाणेरडी झाल्यास किंवा त्यावर मळ-डाग लागले तर लगेच दिसून येतात. या कारणानेही हॉटेलमधील बेडवर बेडशीट किंवा उशीचं कव्हर पांढऱ्या रंगाचंच असतं.
ब्लीचिंग करणं सोपं
हॉटेलमध्ये आलेले पाहुणे अनेकदा बेडवर बसून जेवण करतात किंवा काही खातात-पितात. अशात पांढऱ्या बेडशीटवर चुकीने जर एखादा डाग लागला असेल तो लगेच दिसतो आणि त्यावर ब्लीच करणं सोपं होतं. म्हणूनही पांढऱ्या रंगाची बेडशीट सोयीस्कर पडते.
स्ट्रेसपासून सुटका
अनेकदा लोक सुट्यांमध्ये आपला स्ट्रेस घालवण्यासाठी बाहेर फिरायला जातात. अशात त्यांना रिलॅक्स वाटावं म्हणूनही पांढऱ्या रंगाची बेडशीट वापरली जाते.
महत्वाचं कारण
1990 च्या आधी हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या रंगांच्या चादरी वापरल्या जायच्या. त्यावर काही डाग लागले तरी ते दिसून येत नव्हते. त्यानंतर वेस्टिन हॉटेल डिझायनर्सनी एक रिसर्च केला. त्यानंतर ग्राहकांचा विचार करून हॉटेलमधील बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट वापरण्याचा ट्रेन्ड सुरु झाला.