ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर हिरवा पोशाख का परिधान करतात? असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 00:22 IST2022-11-18T00:22:11+5:302022-11-18T00:22:47+5:30

काही संशोधक आणि एक्सपर्ट्सनी म्हटले आहे, की हिरवा रंग आपले मन शांत करतो.

Why do doctors wear green during surgery know about the know scientific reason | ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर हिरवा पोशाख का परिधान करतात? असं आहे कारण

प्रतिकात्मक फोटो.

आपण सर्वजण कधी ना कधी, काही ना काही कारणांने रुग्णालयात गेला असालच. आपण रुग्णालयात गेल्यानंतर एक गोष्ट निश्चित पणे पाहिली असेल, की डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नेहमीच पांढऱ्या रंगाचा कोट अथवा कपड्यांमध्ये असतात. पण हेच डॉक्टर आणि नर्स जेव्हा ऑपरेशनसाठी जातात, तेव्हा ते हिरव्या अथवा निळ्या रंगाचा पोशाख परिधान करता. पण ते असे का करतात? याचा आपण कधी विचार केलाय का? खरे तर या मागे एक वैज्ञानिक कारण आहे.

खरे तर, पूर्वी डॉक्टर ऑपरेशन करतानाही पांढराच पोशाख वापरायचे. मात्र, 20 व्या शतकाच्या सुरूवातीला, एका प्रसिद्ध डॉक्टरांनी पांढऱ्या पोशाखेऐवजी हिरव्या रंगाचा पोशाख वापरला. त्यांना वाटले की, ऑपरेशन करताना डॉक्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफच्या डोळ्यांना आराम मिळेल. तसेच, काही संशोधक आणि एक्सपर्ट्सनी म्हटले आहे, की हिरवा रंग आपले मन शांत करतो.

अनेक वेळा डॉक्टरांना बराच काळ ऑपरेशन थिएटरमध्ये रहावे लागते. यावेळी  त्यांना वारंवार रक्ताचा लाल रंग बघावा लागतो. बराच वेळ डोळ्यासमोर लाल रंग असल्याने त्यांच्या डोळ्यांवर ताण पडतो. यामुळे त्यांना सर्जरीवर फोकस करणे कठीनही जात असावे. त्यांच्या डोळ्यांना सातत्याने लाल रंग बघावा लागू नये म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या रंगाचा पोशाक परिधान करतात. 

विजुअल एक्सपर्ट्सच्या मते, लाल रंगावर सतत फोकस केल्याने, ऑपरेशन करणार्‍या सर्जनला पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग पाहिल्यानंतर हिरवा रंग दिसल्याचा भ्रम निर्माण होईल. अर्थात, जर एखाद्या डॉक्टरने रुग्नाचे रेड बॉडी टिशूज सतत पाहिल्यानंतर, आपली दृष्टी पांढरा कोट अथवा पांढऱ्या सर्जिकल मास्क लावलेल्या एखाद्या हरकाऱ्यावर पडली तर त्याला प्रत्येक रंगाच्या बाबतीत 'छायाभ्रम' दिसतील.वैज्ञानिक भाषेत याला 'व्हिजुअल इल्यूजन' म्हणतात. 

Web Title: Why do doctors wear green during surgery know about the know scientific reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.