जगभरातील मोठ्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:42 IST2023-09-11T10:42:05+5:302023-09-11T10:42:17+5:30
Black Cars: नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे.

जगभरातील मोठ्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या कारण...
World Top Leaders: जगभरातील नेत्यांच्या गाड्या हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जगभरात मोठ्या नेत्यांच्या मागे 24 तास मोठी सिक्युरिटी असते. त्यांना धोका असतो म्हणून सतत गार्ड्स त्यांच्यासोबत असतात. पण यात एक लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो?
नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचा रंग काळा का असतो? मुळात यामागे काही नियम नाही. तर ही बाब पंरपरेनुसार चालत आली आहे.
एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा खूप आधी रंगांचा वापर सुरू झाला तेव्हा काळा रंग पारंपारिक रंग होता. याच रंगाचा वापर चित्र काढण्यासाठी, पांडुलिपी लिहिण्यासाटी आणि गाड्यांना रंगवण्यासाठी केला जात होता. त्यावेळी गाड्या काळ्या रंगाच्याच होत होत्या.
भारतातही डार्क काळ्या रंगाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. भारतीय आर्टिस्ट्स आणि कैलिग्राफर्सने याचा खूप वापर केला आहे. या काळ्यात शाईमधून एक सुगंध येतो. त्याशिवाय काळा रंग शक्ती, ताकद आणि अधिकारालाही दर्शवतो.
अमेरिकेत तर काळ्या रंगाचा वापर सीक्रेट सर्विसही करते. तसेच तेथील राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचाही रंग आधीपासून काळाच आहे. ही परंपरा पुढे सुरू राहिली आणि जवळपास सगळ्यात देशातील राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचा रंग काळाच ठेवण्यात आला.