IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:53 IST2020-08-17T17:53:08+5:302020-08-17T17:53:36+5:30
आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते.

IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला
नवी दिल्ली – युपीएससी परीक्षा जितक्या कठीण असतात तितकेच परीक्षा पास झाल्यानंतर असणारी मुलाखतही कठीण असते. ज्यात अशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा अंदाज तुम्हाला पटकन शोधून काढणं अडचणीचं ठरतं. या मुलाखतीच्या माध्यमातून समोरचा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र आहे की नाही? हे ठरवलं जातं. त्यामुळे आयएएस होणं किती कठीण काम आहे हे या मुलाखतीवरुनही दिसून येते.
आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते. ही कठीण परीक्षा पास करणारे ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती होते. योगेश मिश्रा यांनी एका चॅनेलच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मला यूपीएससी(UPSC) मुलाखतीत असा प्रश्न विचारण्यात आला होता जो प्रत्येक उमेदवाराला विचारण्यात येतो.
मी मुलाखत देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा समोर असणाऱ्या पॅनेलिस्टमधील चेअरमनने मला विचारले, तुला आएएस(IAS) का बनायचं आहे? सर्वसामान्य जेवढे उमेदवार असतात त्यांना हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यावेळी मला काही स्पष्टता नव्हती, म्हणून माझ्या तोंडातून उत्तर आले की, मला स्वत:लाच माहिती नाही मला आयएएस का बनायचं आहे. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते कारण माझ्या उत्तराकडे पॅनेल जास्त लक्ष दिलं नाही ते म्हणाले, मी माझा प्रश्न बदलतो.
त्यानंतर पॅनेलिस्टने प्रश्न विचारला की, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, चांगल्या पदावर नोकरी करत होता. तरीही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? पॅनेलिस्टने प्रश्न बदलला तसे मीही माझंही उत्तर बदलले असं योगेश मिश्रा यांनी सांगितले. यूपीएसएसीच्या मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील हे तुम्हाला माहिती नाही. पण पॅनेल कोणत्याही उमेदवारामध्ये हे पाहते की, तणावाच्या स्थितीत तुम्ही स्वत:चं भान विसरता की स्वत:ला नियंत्रणात ठेवता असं योगेश यांनी सांगितले.