वॉश बेसिनमध्ये एक छोटं छिद्र का असतं? तुम्हालाही माहीत नसेल कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:43 IST2024-12-20T16:43:27+5:302024-12-20T16:43:58+5:30

बेसिनमध्ये हे छोटं छिद्र कशासाठी दिलेलं असतं? कदाचित जास्तीत जास्त लोकांना याचा उद्देश माहीत नसेल. तोच आज जाणून घेणार आहोत.

Why bathroom sink has small hole, know its work | वॉश बेसिनमध्ये एक छोटं छिद्र का असतं? तुम्हालाही माहीत नसेल कारण!

वॉश बेसिनमध्ये एक छोटं छिद्र का असतं? तुम्हालाही माहीत नसेल कारण!

बाथरूममधील वॉश बेसिनमध्ये हात किंवा तोंड धुताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, नळाच्या खाली एक छोटं छिद्र असतं. मोठ्या छिद्रासोबतच यात एक छोटं छिद्र असतं. पण तुम्हाला माहीत आहे का की, बेसिनमध्ये हे छोटं छिद्र कशासाठी दिलेलं असतं? कदाचित जास्तीत जास्त लोकांना याचा उद्देश माहीत नसेल. तोच आज जाणून घेणार आहोत.

छोट्या छिद्राचं काम काय?

बाथरूमच्या सिंकमध्ये छोटं छिद्र ओव्हरफ्लो रोखण्यासाठी असतं अनेक पाणी जाण्याच्या मोठ्या छिद्रात काहीतरी अडकलं. ज्यामुळे सिंकमधून पाणी जात नाही किंवा ते हळूहळू बाहेर जातं. तेव्हा हे छोटं छिद्र आपलं काम करतं. सिंकमध्ये भरलेलं पाणी या छिद्रापर्यंत आलं की, यातून पाणी बाहेर जाऊ लागतं. यामुळे सिंकच्या वरून पाणी बाहेर येत नाही. 

या छिद्राचं दुसरं काम म्हणजे हवा बाहेर काढणं. जेव्हा ड्रेनच्या छिद्रातून हवा निघत नाही तेव्हा पाणी हळूहळू सिंकमधून बाहेर जातं. अशात या छिद्राच्या माध्यमातून हवा पास होते. हवे व्यवस्थित निघाल्यावर सिंक व्यवस्थित काम करतं. याचप्रमाणे बाथटबमध्येही ओव्हरफ्लो होल असतं. अनेकदा लोक बाथटबमधील नळ चालू करून लोक दुसरं काम करायला लागतात. अशात टब भरला की, ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून छोटं छिद्र असतं. ज्यातून एक्स्ट्रा पाणी बाहेर काढलं जातं.

प्लास्टिक स्टूलमध्येही असतं छिद्र

स्टूल लोकल असो वा ब्रॅंडेड छिद्र दोन्हींमध्ये असतं. स्टूलमध्ये छिद्र प्रेशर आणि व्हॅक्यूम पास करण्यासाठी असतं. स्टूल ठेवायला जास्त जागा लागत नाही आणि एकावर एक ठेवले जातात. अशात जर यात छिद्र नसेल तर स्टूल एकावर ठेवल्याने प्रेशर व व्हॅक्यूममुळे एकमेकांमध्ये फसतील. त्यामुळे त्यांना वेगळं करणं अवघड जाईल. याच कारणानं स्टूलमध्येही छिद्र असतं.

Web Title: Why bathroom sink has small hole, know its work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.