देशातील एक असं फेमस रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी नाही एकही रस्ता, स्टेशन असूनही थांबत नाही गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:56 IST2026-04-11T12:55:28+5:302026-04-11T12:56:25+5:30

Indian Railway Facts : आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी रस्ताच नाही. इतकंच नाही तर स्टेशन असूनही इथे रेल्वे थांबतही नाही. पाहुयात कोणतं आहे हे रेल्वे स्टेशन....

Which railway station in India that has no road access | देशातील एक असं फेमस रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी नाही एकही रस्ता, स्टेशन असूनही थांबत नाही गाडी

देशातील एक असं फेमस रेल्वे स्टेशन जिथे जाण्यासाठी नाही एकही रस्ता, स्टेशन असूनही थांबत नाही गाडी

Indian Railway Facts : रेल्वे प्रवासासाठी सगळ्यात आवडीचं साधन मानलं जातं, यात काहीच दुमत नाही. बरेच लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. आता तर दुसऱ्या शहरांमध्ये नोकरी करणारे लोकही रेल्वेने प्रवास करतात. कारण रेल्वे वेळेत आपल्या ठिकाणावर पोहोचता येतं. पैसेही कमी लागतात आणि प्रवासही आरामदायक होतो. देशात ७ हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांवरून लोक रेल्वेतून प्रवास करतात.

रोज साधारण २.५ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. सगळ्याच रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबतात आणि लोक आपला प्रवास करतात. सामान्यपणे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी व्यवस्थित एक रस्ता असतो, ज्यावरून प्रवासी सहजपणे स्टेशनला पोहोचू शकतात. पण आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे जाण्यासाठी रस्ताच नाही. इतकंच नाही तर इथे रेल्वे थांबतही नाही. पाहुयात कोणतं आहे हे रेल्वे स्टेशन....

कोणतं आहे ते रेल्वे स्टेशन?

आम्ही आपल्याला रेल्वे स्टेशनबाबत सांगत आहोत, ते स्टेशन गोवा - कर्नाटक सीमेवर आहे. या स्टेशनचं नाव आहे दूधसागर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जिथे पोहोचण्यासाठी आपल्याला रस्ताच नाही. इथे आपण एखाद्या दुसऱ्या रेल्वेनेच पोहोचू शकता. या स्टेशनवर एखाद्या दुसऱ्या रेल्वेने किंवा मग पश्चिम घाटातून ट्रेकिंग करत पोहोचता येतं. तशी या स्टेशनवर रेल्वे थांबत नाही, पण धबधब्याजवळ रेल्वेचा स्पीड कमी केला जातो. जेणेकरून पर्यटक त्याचा आनंद घेऊ शकतील.

या स्टेशनसाठी रस्ता का नाही?

रेल्वे स्टेशन आहे पण रेल्वे थांबत नाही किंवा तिथे जाण्यासाठी रस्ता का नाही? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मुळात हा पूर्ण परिसर संरक्षित जंगल आहे आणि इथे पर्यावरणासंबंधी नियमांमुळे रस्ते बनवण्यात आले नाहीत. त्याशिवाय ही रेल्वे लाइन ब्रागांजा घाटाच्या डोंगरांमधून जाते आणि त्यामुळे इथे रस्ता तयार करणं देखील शक्य नाही. तसेच हे स्टेशन केवळ क्रॉसिंग, लूप, सिग्नलिंग आणि लोकोमोटिव कंट्रोलसंबंधी थांब्यासाठी आहे. हे स्टेशन प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठी नाही.

Web Title : भारत का अनोखा रेलवे स्टेशन: सड़क नहीं, ट्रेनें भी नहीं रुकतीं।

Web Summary : गोवा-कर्नाटक सीमा पर स्थित दूधसागर रेलवे स्टेशन तक सड़क मार्ग नहीं है। केवल ट्रेन या ट्रेकिंग से पहुंचा जा सकता है। यह स्टेशन संरक्षित वन क्षेत्र में है, जो यात्रियों के लिए नहीं, बल्कि सिगनलिंग के लिए है।

Web Title : India's unique railway station: No road access, trains don't stop.

Web Summary : Dudhsagar railway station, on the Goa-Karnataka border, lacks road access. Reachable only by train or trekking, trains slow down near the waterfall for tourists. It's in a protected forest area, mainly for signaling, not passenger use.