भारतातील कोणत्या राज्याला 'स्लीपिंग स्टेट' म्हटलं जातं? पाहा किती वाजता झोपतात येथील लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:48 IST2025-11-18T14:47:18+5:302025-11-18T14:48:57+5:30
Sleeping State of India: इथले शांत, निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाशी जोडून जगण्याची पद्धत, येथील लोकांचं रोजचं जीवन इतर राज्यांच्या तुलनेत खूप वेगळे बनवते.

भारतातील कोणत्या राज्याला 'स्लीपिंग स्टेट' म्हटलं जातं? पाहा किती वाजता झोपतात येथील लोक
Sleeping State of India: भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. प्रत्येक राज्याची खासियत, संस्कृती आणि जीवनशैली एकमेकांपासून खूप वेगळी आहे. याच भारतात एक असेही राज्य आहे, ज्याला लवकर झोपण्याच्या सवयीमुळे ‘स्लीपिंग स्टेट’ म्हणून ओळखलं जातं, ते म्हणजे हिमाचल प्रदेश. इथले शांत, निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाशी जोडून जगण्याची पद्धत, येथील लोकांचं रोजचं जीवन इतर राज्यांच्या तुलनेत खूप वेगळे बनवते.
हिमाचलमधील जीवनशैली
हिमाचलचे लोक साधी, शिस्तबद्ध रूटीन पाळतात. असं म्हटलं जातं की ग्रामीण भागात लोक रात्री 8 ते 9 वाजताच झोपतात. सकाळच्या बाबतीत तर येथील बहुतेक लोक सूर्योदयाआधीच उठतात. ही सवय त्यांच्यासाठी फक्त परंपरेचा भाग नाही, तर त्यांच्या चांगल्या आरोग्याचं एक रहस्यही आहे.
शांत वातावरणामुळे मिळते गाढ झोप
हिमाचल आपल्या शांत, प्रदूषणमुक्त आणि सुखद वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इथे आवाज, ट्रॅफिक आणि धूर-धुळीचे प्रमाण खूपच कमी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे गावांमध्ये आणि छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना लवकर झोप लागते. डोंगरांमधून येणारी गार ताजी हवा, चारही बाजूंची हिरवळ आणि शांत रात्री या सर्व गोष्टी लोकांना नैसर्गिकरित्या लवकर झोपण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच हिमाचल प्रदेशाला अनेकदा ‘स्लीपिंग स्टेट’ असे म्हटले जाते.
निसर्गाशी ताळमेळ असलेली जीवनशैली
हिमाचलमध्ये लोक आपली जीवनशैली निसर्गाच्या चक्रानुसार जगतात. इथले बहुतांश काम सूर्य उगवल्यावर सुरू होते. सकाळी लवकर उठून शेती, पशुपालन आणि घरगुती कामांची सुरुवात होते. संध्याकाळ होताच कामे आटोपतात आणि लोक विश्रांती घेऊ लागतात. निसर्गाच्या गतीनुसार जगण्यामुळे येथील लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अधिक निरोगी असतात.