Richest District of India: जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती किंवा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची नेहमीच चर्चा होते. एलन मस्क, मुकेश अंबानी, गौतम अदानी, जेफ बेझॉस, बिल गेस्ट ही नावं नेहमीच चर्चेत असतात. पण देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा कोणता हे आपल्याला माहीत नसेल. अशात देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा कोणत्या आधारावर ठरवला जातो आणि कोणता जिल्हा सगळ्यात श्रीमंत आहे? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
इकॉनॉमिक सर्वेनुसार, देशातील सगळ्यात श्रीमंत जिल्हा तेलंगणातील रंगारेड्डी आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात प्रति व्यक्ती उत्पन्न 11.46 लाख रूपये इतकं आहे. सर्वाधिक प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत गुरुग्राम, बेंगळुरू अर्बन, गौतम बुद्ध नगर (नोएडा), सोलन, नॉर्थ आणि साउथ गोवा, गंगटोक, नामची, मंगन, ग्यालशिंग, मुंबई आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.
इकॉनॉमिक सर्व्हे 2024-25 काय सांगतो?
इकॉनॉमिक सर्व्हे 2024-25 नुसार, रंगारेड्डी जिल्हा प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्याला आयटी सेक्टर, प्रसिद्ध टेक पार्क्स, बायोटेक आणि फार्मास्युटिकल कंपन्या यांचा मोठा फायदा झाला आहे. प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत देशाची राजधानी दिल्ली देखील रंगारेड्डीपेक्षा खूप मागे आहे. इकोनॉमिक सर्व्हे 2024-25 नुसार दिल्लीचे प्रतिव्यक्ती उत्पन्न 4,93,024 रुपये आहे.
दुसरा क्रमांक – गुरुग्राम (हरियाणा)
प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत हरियाणातील गुरुग्राम दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील प्रतिव्यक्ती उत्पन्न 9.05 लाख रुपये आहे. गुरुग्राममध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ऑफिसेस, बीपीओ आणि कॉर्पोरेट नोकऱ्या यामुळे येथील लोकांचे उत्पन्न देशातील इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. संपूर्ण जिल्हा कॉर्पोरेट संस्कृतीसाठी ओळखला जातो. याच शहराजवळ सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान देखील आहे.
तिसरा क्रमांक – गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा)
नोएडा–ग्रेटर नोएडा (गौतम बुद्ध नगर) प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथील प्रतिव्यक्ती उत्पन्न 8.48 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. हा जिल्हा प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत जपानच्या बरोबरीकडे वाटचाल करत आहे. तसेच, हा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक उत्पन्न असलेला जिल्हा आहे.
चौथा ते दहावा क्रमांक
चौथा क्रमांक – हिमाचल प्रदेशातील सोलन - प्रतिव्यक्ती उत्पन्न: 8.10 लाख रुपये
पाचवा क्रमांक – कर्नाटकातील बेंगळुरू शहर - प्रतिव्यक्ती उत्पन्न: 8.03 लाख रुपये
सहावा क्रमांक – नॉर्थ आणि साउथ गोवा - प्रतिव्यक्ती उत्पन्न: सुमारे 7.63 लाख रुपये
सातवा क्रमांक – सिक्कीमची राजधानी गंगटोक - प्रतिव्यक्ती उत्पन्न: सुमारे 7.46 लाख रुपये
आठवा क्रमांक – कर्नाटकातील मंगळूर - प्रतिव्यक्ती उत्पन्न: 6.69 लाख रुपये
नववा क्रमांक – देशाची आर्थिक राजधानी मुंबई - प्रतिव्यक्ती उत्पन्न: 6.57 लाख रुपये
दहावा क्रमांक – अहमदाबाद - प्रतिव्यक्ती उत्पन्न: 6.54 लाख रुपये
Web Summary : Telangana's Rangareddy is India's wealthiest district, boasting ₹11.46 lakh per capita income, driven by IT and pharma sectors. Gurugram and Gautam Buddh Nagar follow. Delhi lags behind.
Web Summary : तेलंगाना का रंगारेड्डी भारत का सबसे धनी जिला है, जिसकी प्रति व्यक्ति आय ₹11.46 लाख है, जो आईटी और फार्मा क्षेत्रों से प्रेरित है। गुरुग्राम और गौतम बुद्ध नगर इसके बाद हैं। दिल्ली पीछे है।