शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील सर्वात उंचीवर वसलेले गाव कोणते? लोकसंख्या 150 पेक्षाही कमी, जाणून घ्या..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:12 IST

15,000 फूट उंचीवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावात एकदा तरी जायलाच हवं!

उन्हाळा सुरू होताच अनेकजण सुट्ट्यांसाठी थंडगार भागांत फिरण्याची प्लानिंग करतात. निसर्गरम्य दृश्ये, थंड हवामान आणि शांत वातावरणामुळे पर्वतीय पर्यटनाला विशेष पसंती दिली जात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात उंच गाव कोणते आहे? हे गाव पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे.

हिमाचल प्रदेशात देशातील सर्वात उंच गाव...

हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅलीमध्ये वसलेले कोमिक हे भारतातील सर्वात उंच गाव मानले जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे 15,000 फूट उंचीवर वसलेले हे गाव निसर्गसौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथील पर्वतरांगा, थंड हवामान आणि विरळ वस्तीमुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते.

तांग्युद मठामुळे प्रसिद्ध

कोमिक गावाजवळील तांग्युद मठ (Tangyud Monastery) हे या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा मठ भारतातील सर्वात उंच मठांपैकी एक मानला जातो. याची स्थापना अंदाजे 14व्या शतकात झाली असल्याचे मानले जाते. बौद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वातावरणामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

अत्यल्प लोकसंख्या 

2011 च्या जनगणनेनुसार, कोमिक गावात 150 पेक्षा कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे हे गाव अत्यंत शांत आणि विरळ वस्तीचे मानले जाते. विशेष म्हणजे, कोमिक गावात पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या गाडीचा वापर करू शकता. यामुळेच गाडीने पोहोचता येणारे, हे जगातील सर्वात उंच गाव आहे.

पर्यटनासाठी आकर्षण, पण आव्हानही

येथील तापमान वर्षभर अत्यंत कमी राहते. त्यामुळे येथे जाणे हा एक वेगळा अनुभव असला तरी पर्यटकांसाठी आव्हानात्मकही ठरतो. तरीही, निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी कोमिक हे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Komik: India's Highest Village, Less Than 150 Residents, Explore!

Web Summary : Komik, Himachal Pradesh, is India's highest village at 15,000 feet. Known for its beauty, the village has Tangyud Monastery, and a small population. Despite the cold, it attracts nature lovers.
टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश