दृष्ट लागू नये यासाठी 'टच वुड' असाच शब्द का वापरला जातो? पाहा काय आहे याचा इतिहास आणि कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:05 IST2025-11-12T12:32:06+5:302025-11-12T13:05:37+5:30
Why Do We Say Touch Wood : आपण कधी विचार केलाय का की, दृष्ट लागू नये यासाठी टच वुड असं का बोललं जातं? कदाचित अनेकदा आपणही असे बोलले असाल, पण कधी याचा विचार केला नसेल

दृष्ट लागू नये यासाठी 'टच वुड' असाच शब्द का वापरला जातो? पाहा काय आहे याचा इतिहास आणि कारण
Why Do We Say Touch Wood : आपण अनेकदा ऐकत असतो की, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला नजर लागू नये म्हणजेच दृष्ट लागू नये, यासाठी इंग्रजीत 'टच वुड' असं म्हणत लाकडाला किंवा टेबलाला हलका स्पर्श केला जातो. पण आपण कधी विचार केलाय का की, दृष्ट लागू नये यासाठी टच वुड असं का बोललं जातं? कदाचित अनेकदा आपणही असे बोलले असाल, पण कधी याचा विचार केला नसेल. तर हे फक्त एक वाक्य नसून एक जुनी सवय आहे, जी परंपरा, श्रद्धा आणि मनोविज्ञानाशी जोडलेली आहे.
प्राचीन परंपरेशी संबंध
पूर्वीच्या पगान सभ्यतेत लोक असं मानायचे की, झाडांमध्ये देवता आणि आत्मा वास करतात. झाडाला स्पर्श म्हणजे देवाकडून आशीर्वाद मागणं किंवा वाईट शक्तींपासून स्वतःचं रक्षण करणं. त्यामुळे झाड किंवा लाकडाला स्पर्श करणं शुभ मानलं जायचं.
नंतर ख्रिश्चन धर्मातही असं मानलं गेलं की येशू ख्रिस्ताच्या क्रॉसचं लाकूड पवित्र आहे, आणि त्याला स्पर्श केल्याने आशीर्वाद मिळतो. हळूहळू ही प्रथा युरोपभर पसरली आणि “टच वुड” ही म्हण सामान्य झाली.
लाकूडच का?
लाकूड हे माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. घर, फर्निचर, साधनं सगळं लाकडाचं बनलेलं असतं. झाड म्हणजे जीवन, ऊर्जा आणि सातत्याचं प्रतीक मानलं जायचं. म्हणून लाकडाला स्पर्श म्हणजे निसर्गाच्या शुभ शक्तींना जागं करणं आणि स्वतःचं रक्षण करणं असं समजलं जातं.
मनोविज्ञान काय सांगतं?
शिकागो विद्यापीठाच्या 2013 च्या संशोधनानुसार, जेव्हा लोक 'माझ्यासोबत काही वाईट झालं नाही' असं बोलतात आणि लगेच लाकडाला स्पर्श करतात, तेव्हा त्यांना मानसिक सुरक्षिततेची भावना मिळते. हे एकप्रकारे “वाईट नशिब दूर ठेवणं” आहे. म्हणजेच “टच वुड” ही कृती अंधश्रद्धा नाही, तर मन शांत ठेवण्याचा एक मानसशास्त्रीय उपाय आहे.
जगभरातील वेगवेगळे प्रकार
भारत आणि ब्रिटनमध्ये – “टच वुड”
अमेरिका, कॅनडा – “नॉक ऑन वुड”
तुर्कीमध्ये – लाकडावर दोनदा ठकठक करून कानाला हात लावतात
ब्राझीलमध्ये – bater na madeira असं म्हणतात
भाषा वेगळी, पण अर्थ एकच — “आपलं नशीब चांगलं राहो.”
आजच्या काळात अर्थ
आज विज्ञानाच्या काळातही “टच वुड” ही सवय कायम आहे. लोक चांगल्या गोष्टी बोलताना हे म्हणतात — म्हणजे नम्रता आणि सावधपणा दाखवण्याचा मार्ग. “सध्या सगळं ठीक आहे, पण काहीही होऊ शकतं.”