Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:21 IST2024-11-25T15:19:16+5:302024-11-25T15:21:19+5:30
Mukesh Ambani House: अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या एंटीलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, एंटीलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता?

Antilia आधी कुठे राहत होते मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार? आता त्या घरात कोण राहतं?
Mukesh Ambani House: देश आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं महागडं व आलिशान घर नेहमीच चर्चेचा विषय असतं. मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार मुंबईतील सगळ्यात महाग अॅंटिलियामध्ये राहतो. २७ मजली हे घर जगातील सगळ्यात महागड्या घरांपैकी एक आहे. अनेक सुविधा आणि आधुनिक टेक्नॉलॉजी असलेल्या अॅंटिलियाची किंमत १५००० कोटी सांगण्यात येते. मात्र, अॅंटिलियामध्ये राहण्याआधी मुकेश अंबानी यांचा परिवार कुठे राहत होता?
मुकेश अंबानी यांचा परिवारा अॅंटिलियाच्या आधी मुंबईच्या सी विंड अपार्टमेंटमध्ये राहत होते. मुंबईच्या कोलाबा येथील १४ मजली इमारतीलमध्ये पूर्ण अंबानी परिवार राहत होता. मुकेश अंबानी यांच्यासोबतच अनिल अंबानी यांचाही परिवार याच घरात राहत होता.
धीरूबाई अंबानी यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये या घराचा उल्लेख केला होता. या उंच इमारतीमध्ये घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक फ्लोर होता. अनेक सोयी-सुविधा असलेल्या या इमारतीमध्ये अंबानी परिवार अनेक वर्ष सोबत राहिला. २०११ मध्ये मुकेश अंबानी आपल्या परिवारासोबत अॅंटिलियामध्ये शिफ्ट झाले.
कफ परेड रोडच्या सी विंड इमारतीमध्ये अनेक सोयी-सुविधा आहेत. पण 40000 स्क्वेअर फूट परिसरात असलेल्या अॅंटिलियासमोर ही इमारत डावीच आहे. मुंबईच्या अल्टमाउंड रोडवरील अॅंटिलियाला शिकागोचे आर्किटेस्ट पार्किंस अॅन्ड विले यांनी डिझाइन केलं.
मुकेश अंबानी अॅंटिलियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर अनिल अंबानी सी विंड हाऊसमध्येच राहत होते. पण नंतर काही वर्षांनी ते आपल्या परिवारासोबत पाली हिल स्थित नवं घर Adobe मध्ये राहतात. 160000 वर्ग मीटरमध्ये असलेलं हे घरही आलिशान आहे. या घराची किंमत अंदाजे 5000 कोटी सांगितली जाते. तेच सी विंड येथील अंबानी यांच्या जुन्या घराची मालकी अनिल अंबानी यांच्याकडेच आहे.