शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

भेंडीवरून पडलंय का मुंबईच्या 'भेंडी बाजार'चं नाव? सत्य वाचाल तर मारून घ्याल कपाळावर हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:44 IST

Interesting Facts : प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली.

Interesting Facts : मुंबईतील अनेक ठिकाणं आपल्या वेगळ्या नावांमुळे किंवा त्या ठिकाणातील एखाद्या खास गोष्टीमुळे चर्चेत असतात. मुंबईतील एक असंच ठिकाण म्हणजे 'भेंडी बाजार'. भेंडी बाजारात इमारती एकमेकींवर जणू झोपल्यात असं वाटतं. गर्दी इतकी असते की, बाहेर कसं पडावं असा प्रश्न पडतो. दुकानातील आवाज सतत कानावर पडतात. भलेही इथे भरपूर गोंगाट, गोंधळ असतो, पण एक वेगळीच एनर्जी इथे जाणवते. अनेकांना असं वाटत असेल की, या भागाचं नाव 'भेंडी'वरून ठेवण्यात आलं असेल. लोकही सहजपणे भेंडी बाजार...भेंडी बाजार असं म्हणतात. पण लोक इथेच फसतात. गमतीदार बाब म्हणजे या भागाचा भेंडीच्या भाजीसोबत काहीही संबंध नाही.

प्रसिद्ध शेफ रणवीर बरारने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका रहस्याचा उलगडा केला आहे. गंमत म्हणजे भेंडीची भाजी बनवत बनवत त्याने एक ऐतिहासिक बाब सांगितली. जी अनेकांना माहीत नसेल.

शेफ बरारनुसार, हे नाव ब्रिटिश काळाशी संबंधित आहे. हा भाग क्रॉफर्ड मार्केटच्या अगदी मागे आहे. इंग्रज आपल्या साध्यासोप्या भाषेत याला 'बिहाइंड द बाजार'(Behind the Bazaar) म्हणत होते. पण स्थानिक लोकांसाठी याचा उच्चार करणं अवघड होतं. हळूहळू याच बिहाइंड द बाजारची जागा 'भेंडी बाजार' असं झालं.

भांड्यांचा संदर्भ

या भागाची केवळ 'बिहाइंड द बाजार' ही एकच कहाणी नाही. काही लोक याबाबत वेगळी थेअरी मांडतात. त्यांचं मत आहे की, हे नाव मराठी शब्द 'भांडी'वरून पडलेलं असू शकतं.

इतिहासानुसार, या भागात फार पूर्वी कुंभारांची वस्ती होती. हे लोक मातीची भांडी बनवत होते आणि विकत होते. त्यामुळे असंही होऊ शकतं की, ज्या ठिकाणाला लोक आधी 'भांडी बाजार' म्हणत होते, ते कालांतराने बदलून 'भेंडी बाजार' पडलं. थेअरी काहीही असो, पण या ठिकाणाचा भेंडीच्या भाजीसोबत काहीही संबंध नाही हे नक्की.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's 'Bhendi Bazaar': Origin from Okra? The real story revealed!

Web Summary : Mumbai's Bhendi Bazaar's name isn't from okra. Chef Ranveer Brar reveals it's derived from 'Behind the Bazaar' (British era) or 'Bhandi Bazaar' (pottery). The area has no connection to okra.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स