रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:42 IST2025-12-19T13:38:10+5:302025-12-19T13:42:48+5:30
PNR Number Full Form : रेल्वेच्या पीएनआरचा फुल फॉर्म आपल्याला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर आज याच पीएनआर कोडचा फुल फॉर्म काय असतो हेच पाहणार आहोत.

रेल्वेच्या PNR नंबरचा फुल फॉर्म काय असतो आणि तो कसा तयार होतो? रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती
PNR Number Full Form : भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षेसाठी आणि आरामासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. देशभरात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. हे मोठं आणि जबाबदारीचं काम रेल्वेकडून चोख पार पाडलं जातं. रेल्वेने अनेक लोक नेहमीच प्रवास करत असतात. पण तरीही त्यांना रेल्वेबाबतच्या काही गोष्टी माहीत नसतात. रेल्वेकडून आपल्या सेवांचे काही शॉर्ट फॉर्म बनवले जातात. पण त्यांचा पूर्ण अर्थ प्रवाशांना माहीत नसतो, जो माहीत असणं आवश्यक आहे. असाच एक शॉर्ट फॉर्म म्हणजे PNR कोड. रेल्वेच्या पीएनआरचा फुल फॉर्म आपल्याला माहीत आहे का? जर नसेल माहीत तर आज याच पीएनआर कोडचा फुल फॉर्म काय असतो हेच पाहणार आहोत. त्याआधी आपण पीएनआर नंबर कसा तयार होतो, हे जाणून घेऊया.
PNRनंबरचा फुल फॉर्म
पीएनआर नंबरचा फुल फॉर्म पॅसेंजर नेम रेकॉर्ड (Passenger Name Record) असा आहे. जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हा एक डिजिटल रेकॉर्ड तयार होतो, जो या १० अंकी कोडमध्ये असतो. प्रत्येक आरक्षित तिकिटासाठी हा कोड रिलीज केला जातो.
कसा तयार होतो पीएनआर नंबर?
पीएनआर नंबर कसा तयार होतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा यूनिक नंबर कसा तयार होतो, हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. हा नंबर प्रवाशासाठी एकप्रकारे ओळखपत्रच असतो. तिकिटावर हा नंबर असतो, त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना डिजिटल किंवा फिजिकल तिकीट दाखवायचं असतं.
रेल्वे झोननुसार नंबरांचं विभाजन
पीएनआर नंबर १० अंकांचा असतो. जो तीन भागांमध्ये विभागलेला असतो. ज्यात पहिले तीन अंक हे दाखवतात की, तिकीट कोणत्या रेल्वे स्टेशनहून जारी केलं आहे. यात उत्तर रेल्वेसाठी १ ते ३, दक्षिण रेल्वेसाठी ४ ते ६ आणि पूर्व रेल्वेसाठी ७ ते ९ नंबर आहेत. त्यानंतर शिल्लक राहिलेले ७ नंबर कॉम्प्यूटर सिस्टीम जनरेट यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतात. ज्यात प्रवासाची तारीख, वेळ इत्यादी माहिती दडलेली असते. पीएनआर नंबरमध्ये छापलेल्या माहितीमध्ये प्रवाशाचं नाव, वय, रेल्वेचं नाव, रेल्वेचा नंबर, वेळ, तिकीट कन्फर्म आहे की नाही याची माहिती, कोच आणि सीटची माहिती असते.