"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 16:27 IST2020-09-04T16:19:05+5:302020-09-04T16:27:31+5:30
पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे.

"काय केलतं त्या पबजीनं?... इथे परिस्थिती काय?"; वैतागलेल्या PUBG वेड्या पोराचा व्हिडीओ व्हायरल
मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून नुकताच घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर एका पबजीवेड्या मुलानं त्याच्या भावनांना वाट मोकळी केली. सोशल मीडियावर त्या मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मराठी कुटुंबातील हा व्हिडीओ आहे आणि त्याला त्याचा राग कसा आवरावा हेच सूचेनासे झाले आहे.
पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ६९ ए च्या अंतर्गत पबजीसह ११८ मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या अॅप्सबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरील अनेक अॅप्सबद्दल सरकारकडे तक्रारी आल्या होत्या, असंही मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
काय म्हणतोय तो मुलगा?
काय केलतं त्या पबजीनं, उगाच बॅन केलं... मम्मी तू शांतच बस बघ, इथे परिस्थिती काय आहे?...आधी काय बघत होतो का? हिचं इस्टा बॅन करनं.. इस्टा फिंस्टा... काय केलतं का त्या पबजीनं ? किती गाडीच्या स्कीट भेटलेल्या... किती पुढे होतो मी... अरं का केलंsssss.... लय राग यायला लागलाय..
पाहा व्हिडीओ...
हिचं इस्टा बॅन करना... इस्टा फिंस्टा... #PUBGBANNED#PUBGpic.twitter.com/NtxILOQ9Gl
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
वाघिण मुंबईत येतेय, दम असेल तर अडवून दाखवा; बबिता फोगाटनं दिलं चॅलेंज
चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स सलामीला भिडणार; BCCI लवकरच वेळापत्रक जाहीर करणार
सुरेश रैनापाठोपाठ हरभजन सिंगचीही IPL2020मधून माघार; CSKला मोठा धक्का