सोन्यापेक्षाही महाग असते व्हेल माशाची घाणेरडी उलटी, कारण वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:26 IST2024-12-13T12:25:53+5:302024-12-13T12:26:30+5:30

Whale Vomit: व्हेलची उलटी ज्याला एम्बरग्रीस म्हटलं जातं. हा व्हेल माशाच्या शरीरातून निघणारा एक ठोस पदार्थ आहे. हा पदार्थ व्हेलच्या आतड्यांमध्ये बनणारी विष्ठा आहे.

Whale vomit costlier than gold, reason will shock you | सोन्यापेक्षाही महाग असते व्हेल माशाची घाणेरडी उलटी, कारण वाचून व्हाल अवाक्!

सोन्यापेक्षाही महाग असते व्हेल माशाची घाणेरडी उलटी, कारण वाचून व्हाल अवाक्!

Whale Vomit: तुम्ही कधी केलाय का की, एखाद्या जीवाच्या घाणेरड्या उलटीला सोन्यापेक्षाही जास्त किंमत मिळू शकते. कदाचित केला नसेल. मात्र, हे सत्य आहे. व्हेलची उलटी ज्याला एम्बरग्रीस (Ambergris) म्हटलं जातं. या उलटीला कोट्यावधी रूपये किंमत मिळते. याचं कारणही खास आहे. चला तर जाणून घेऊ या उलटीला इतकी किंमत का मिळते?

व्हेलची उलटी ज्याला एम्बरग्रीस म्हटलं जातं. हा व्हेल माशाच्या शरीरातून निघणारा एक ठोस पदार्थ आहे. हा पदार्थ व्हेलच्या आतड्यांमध्ये बनणारी विष्ठा आहे. जो न पचलेल्या पदार्थांपासून तयार होतो आणि उलटीच्या रूपात बाहेर येतो. याचा रंग काळा, पिवळा किंवा पांढरा असतो. ही उलटी मेणाच्या एखाद्या तुकड्यासारखी दिसते.

व्हेल समुद्रातील वेगवेगळ्या गोष्टी खातात. पण जेव्हा या गोष्टी पचन होत नाही तेव्हा त्या उलटीच्या माध्यमातून बाहेर काढतात. हाच पदार्थ पाण्यावर तरंगत ठोस बनतो. ही उलटी सामान्यपणे स्पर्म व्हेलची असते. 

एम्बरग्रीसमधून दुर्गंधी येते. मात्र, परफ्यूम तयार करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या या उलटीसाठी कोट्यावधी रूपये देण्यास तयार असतात. याची खासियत म्हणजे याने परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकून राहतो. पांढऱ्या रंगाच्या उलटीला परफ्यूम इंडस्ट्रीत खूप जास्त डिमांड असते.

एम्बरग्रीसचा वापर केवळ परफ्यूमसाठी नाही तर औषधे तयार करण्यासाठी देखील केला जातो. जे वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी वापरले जातात. खासकरून लैंगिक समस्या दूर करणाऱ्या औषधांमध्ये याचा वापर होतो. 

१६व्या शतकात ब्रिटनचा राजा चार्ल्स द्वितीय ही उलटी अंड्यांसोबत खात होता. १८व्या शतकात टर्किश कॉफी आणि यूरोपमधील चॉकलेटचा टेस्ट वाढवण्यासाठीही केला जात होता. इतकंच नाही तर इजिप्तमध्ये सिगारेटला फ्लेवर देण्यासाठीही याचा वापर व्हायचा.

Web Title: Whale vomit costlier than gold, reason will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.