जगातली 'ही' पाच विचित्र झाडे बघून भीतीही वाटेल अन् आश्चर्यही होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:56 PM2019-10-02T12:56:57+5:302019-10-02T12:59:16+5:30

आज आम्ही तुम्हाला जगातल्या पाच अशा अजब झाडांबाबत सांगणार आहोत, ज्यांना बघून तुम्हाला फार विचित्र वाटेल. 

Weird plants of the world looking very strange | जगातली 'ही' पाच विचित्र झाडे बघून भीतीही वाटेल अन् आश्चर्यही होईल!

जगातली 'ही' पाच विचित्र झाडे बघून भीतीही वाटेल अन् आश्चर्यही होईल!

Next

जगभरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघायला मिळतात. निसर्गाने दिलेल्या वरदानात या झाडांना स्थानही महत्वाचं आहे. मानवी जीवन चक्रात ही झाडे महत्वपूर्ण भूमिका निभावतात. आज आम्ही तुम्हाला जगातल्या पाच अशा अजब झाडांबाबत सांगणार आहोत, ज्यांना बघून तुम्हाला फार विचित्र वाटेल. 

'बुद्धाज हॅंड' नावाच्या या अजब झाडाला पाहिल्यावर असं वाटतं की, झाडातून अनेक बोटं बाहेर आलीत. मुळात ही एक लिंबाची प्रजाती आहे. पण हे आकाराने गोल नसतात. यांचा सुगंध फार चांगला असतो. अनेकजण याचा वापर रूम फ्रेशनर म्हणूनही करतात.

या झाडाचं नाव डेविल्स टूथ आहे. हे एकप्रकारचं मशरूम आहे. पण हे खाल्लं जात नाही. याच्या वरच्या बाजूला लाल रंगाचे डाग दिसतात. जे माणसाच्या रंगासारखे दिसतात. असं वाटतं झाडातून रक्त निघतंय.

'ब्लॅक बॅट' नावाचं हे झाड पंख पसरवलेल्या एखाद्या वटवाघुळासारखं दिसतं. हे झाड जास्तकरून थायलंड आणि मलेशियात आढळतात. याची पाने १२ इंच आकाराची असतात. रात्री जर कुणी हे झाड पाहिलं तर त्याला हे वटवाघुळच वाटेल. 

या झाडाला 'ऑक्टोपस स्किंकहॉर्न' नावाने ओळखळं जातं. लाल रंगाचं हे झाड एखाद्या आठ पायांच्या ऑक्टोपसप्रमाणे दिसतं. या झाडाची फारच दुर्गंधी येते. यामुळे हे झाड कीटकांना आपल्याकडे अधिक आकर्षित करतं.

Web Title: Weird plants of the world looking very strange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.