पाळीव सश्याला पिंजऱ्यात ठेवायला विसरली एअर हॉस्टेस अन् काय घडलं पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:21 AM2021-11-14T09:21:57+5:302021-11-14T09:24:19+5:30

जेव्हा एखादा पाळीव प्राण्यानं थोडसं काही नुकसान केलं तर त्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण जेव्हा एका प्राण्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान तुम्हाला झालं तर?

weird news when pet rabbit chew expensive items of owners air hostes | पाळीव सश्याला पिंजऱ्यात ठेवायला विसरली एअर हॉस्टेस अन् काय घडलं पाहा... 

पाळीव सश्याला पिंजऱ्यात ठेवायला विसरली एअर हॉस्टेस अन् काय घडलं पाहा... 

Next

जेव्हा एखादा पाळीव प्राण्यानं थोडसं काही नुकसान केलं तर त्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण जेव्हा एका प्राण्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान तुम्हाला झालं तर? एका सश्यानं असाच एक प्रताप विमान प्रवासात केल्याची एक हटके घटना समोर आली आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार ब्रिटन स्थित एका महिलेच्या पाळीव सश्यानं आतापर्यंत तब्बल २ हजार डॉलर रुपये किमतीचं सामना खाऊन टाकलं आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास २ लाख रुपयांपर्यंत जाते. यात अनेक ब्रँडेड बॅग्स, पर्स यांचा समावेश आहे. 

सारा होलिंग्स या इंग्लंडच्या डर्बी येथे राहतात. त्यांनी एक सहा महिन्यांचा गोंडस ससा पाळला आहे. त्याचं नाव बिंक्स असं ठेवलं आहे. बिंक्सनं आतापर्यंत महागडे बुट आणि हँडबँग कुरतडून खाऊन टाकल्या आहेत. आतापर्यंत एकूण मिळून २ लाख रुपयांचं नुकसान बिंक्सनं केलं आहे. 

एकदा तर बिंक्समुळे सारा यांना खूपच धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. सारा या एका विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून काम करतात. त्या एकदा कामावर जाताना बिंक्सला पिंजऱ्यात ठेवायला विसरल्या आणि कामावरुन घरी येऊन पाहातात तर बिंक्सनं नुसता धुमाकूळ घातला होता. बिंक्सनं साराच्या अनेक महागड्या वस्तूंची कुरतडून वाट लावली होती. बिंक्स खूप छोटासा दिसत असला तरी त्यानं आजवर खूप नुकसान केलंय असं ती सांगते. आतापर्यंत बिंक्सनं महागड्या पर्स, बॅग्स, बुटं, कपडे कुरतडून खाल्ले आहेत. 

Web Title: weird news when pet rabbit chew expensive items of owners air hostes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.