भन्नाट! पाठ खाजवून देण्याची अजब नोकरी, १ तासासाठी मिळणारे पैसे वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:37 IST2024-12-18T13:33:33+5:302024-12-18T13:37:47+5:30
सध्या सोशल मीडियावर अशा एका नोकरीची चर्चा सुरू आहे. खासकरून परदेशात अशा अजब नोकऱ्याचा भरपूर केल्या जातात.

भन्नाट! पाठ खाजवून देण्याची अजब नोकरी, १ तासासाठी मिळणारे पैसे वाचून व्हाल अवाक्!
आजकाल पारंपारिक नोकऱ्या सोडल्या तर अशा काही नोकऱ्यांची नेहमीच चर्चा होते ज्या फारच अजब असतात. महत्वाची बाब म्हणजे कधीही कल्पना न केलेल्या या नोकऱ्या करण्यासाठी पैसेही भरपूर मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका नोकरीची चर्चा सुरू आहे. खासकरून परदेशात अशा अजब नोकऱ्याचा भरपूर केल्या जातात.
जगात अशाही काही नोकऱ्या आहेत ज्यांचा कधी कुणी विचारही केला नसेल. पण लोक पैसे मिळतात म्हणून कोणतंही काम करायला तयार असतात. आम्ही ज्या अजब नोकरीबाबत सांगत आहोत ती आहे पाठ खावण्याची नोकरी. बसला ना धक्का! आश्चर्याची बाब म्हणजे एका ठिकाणी यासाठी खास पार्लर तयार करण्यात आलं आहे.
किती मिळतात पैसे?
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, टोनी जॉर्ज नावाच्या एका महिलेने ही सेवा देणं सुरू केलं आहे. या सेवेचं नाव The Scratcher Girls असं ठेवण्यात आलं आहे. नावावरूनच हे लक्षात येतं की, ज्यांची नखं थोडी मोठी असतात अशा तरूणी ही नोकरी करतात. ५५ वर्षीय टोनीने सांगितलं की, तिला बालपणापासूनच पाठ खाजवण्यात मजा येत होती. अशात तिने विचार केला की, खासकरून लठ्ठ लोकांना ही सेवा देणं सुरू करावी. आता हे तिचं प्रोफेशन बनलं आहे, ज्यासाठी ती ११ हजार रूपये प्रति तास इतके पैसे घेते.
स्क्रॅचर गर्ल्सची नखं ३ इंच लांब असतात आणि मेनिक्योरही केलेले असतात. १ तासांच्या सेशनमध्ये आपल्या नखांनी थेरपिस्ट आपल्या क्लाएंटची पाठ, हाथ, डोकं आणि कानाच्या आता खाजवतात. यामुळे क्लाएंटला आराम मिळतो. ही सेवा मेट्रोपॉलिटन शहरं जसे की, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि फिलाडेल्फियामध्ये खूप लोकप्रिय आहे. टोनीने सांगितलं की, तिने बराच रिसर्च केल्यावर ही सेवा मार्केटमध्ये लॉन्च केली आणि याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.