अजबच! २५० किलो वजन, तरीही ती अजून लठ्ठ होण्यासाठी प्रयत्नशील, वजन वाढवण्यासाठी करते एवढं भोजन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 04:14 PM2021-08-29T16:14:32+5:302021-08-29T16:14:42+5:30

Bobbi-Jo Westley News : ४६ वर्षीय बोब्बी नावाची महिला मात्र लठ्ठपणाच्याच प्रेमात पडली आहे. सध्या तिचे वजन २४२ किलो असून, अजून लठ्ठ होण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

Weighing in at 250 kg, she still struggles to gain weight, eating as much as she can to gain weight | अजबच! २५० किलो वजन, तरीही ती अजून लठ्ठ होण्यासाठी प्रयत्नशील, वजन वाढवण्यासाठी करते एवढं भोजन 

अजबच! २५० किलो वजन, तरीही ती अजून लठ्ठ होण्यासाठी प्रयत्नशील, वजन वाढवण्यासाठी करते एवढं भोजन 

Next

पेनिसिल्व्हानिया (अमेरिका) - लठ्ठपणा हा शंभर आजारांचे घर असतो, असे म्हटले जाते. लठ्ठपणामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही लठ्ठ माणसे तर चालू फिरूही शकत नाहीत. थकलेल्यासारखे वाटते. त्यामुळे लोक आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. मात्र पेनिसिल्वानियामधील ४६ वर्षीय बोब्बी नावाची महिला मात्र लठ्ठपणाच्याच प्रेमात पडली आहे. सध्या तिचे वजन २४२ किलो असून, अजून लठ्ठ होण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. अधिकाधिक लठ्ठ होऊन जगातील सर्वात लठ्ठ महिलेचा मान तिला मिळवायचा आहे. त्यासाठी ती दररोज भरपूर भोजनही करते. (Weighing in at 250 kg, she still struggles to gain weight, eating as much as she can to gain weight)

विश्वविक्रम करण्यासाठी बोबी खूप भोजन करते. त्यामुळे तिचे वजन सातत्याने वाढत आहे. आता सर्वाधिक वजनाच्या व्यक्तीचा विक्रम लवकरात लवकर बनवेन असा विश्वास तिला आहे. सध्या बोब्बीची कंबर ही ९५ इंच आहे. आथा तिला तिची कंबर ९९ इंचापर्यंत न्यायची आहे. आता लवकरच ती लॉस इंजिलिसमधील रहिवासी असलेल्या मिकेल रुफ्फिनेल्ली हिचा विक्रम मोडीत काढेल, अशी बोब्बीला अपेक्षा आहे.  लठ्ठपणामुळे बोब्बीचे लाखो फॉलोअर्स जमा झाले आहेत. अनेक लोक बोब्बीचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा खरेदी करतात. बोब्बीचे लाखो ऑनलाईन फॅन्स आहेत. ते तिच्याकडून अनेक प्रकारची कामे करून घेतात. बोब्बीच्या म्हणण्यानुसार लठ्ठपणा हीच तिची ओळख आहे. दरम्यान, बोब्बीला अनेकांनी विवाहाचा प्रस्तावही दिलेला आहे.

मात्र असेच वजन वाढत राहिले तर तिच्या जीवावर बेतू शकते असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मात्र बोब्बीला त्याची फारशी फिकिर नाही. ती जगातील सर्वात लठ्ठ महिला बनण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्न सेवन करते. ती खूप जंकफूड खाते. तिचा डाएट अनहेल्दी आहे. ती सांगते की, हेल्दी अन्न खाल्लं पाहिजे, हे तिला माहिती आहे. मात्र मी असे करू शकत नाही. कंबर ९९ इंचांपर्यंत वाढवण्यासाठी ती सातत्याने काही ना काही खात असते. मात्र आता डॉक्टरांनी तिला डाएट कंट्रोलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.  
 

Web Title: Weighing in at 250 kg, she still struggles to gain weight, eating as much as she can to gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app